इकडं इस्रायल-इराण धुमसलं, तिकडं किम जोंग उन यांचा धडकी भरवणारा आदेश, एका निर्णयामुळे जग टेन्शनमध्ये
Iran And Israel War : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध आता चांगलेच पेटले आहे. असे असतानाच आता किम जोंग उन यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Iran And Israel War : इराण आणि इस्रालय यांच्यातील युद्धाने आता भीषण रुप धारण केलं आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. क्षेपणास्त्र, बॉम्बगोळे डागली जात आहेत. असे असतानाच आता उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग उन याने संपूर्ण जागाला धडकी भरवणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
इराण-इस्रायल यांच्यातील युद्धानंतर आता उत्तर कोरियात हालचाली वाढल्या आहेत. शुक्रवारी इस्रायलने इराणच्या न्युक्लियर ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर आता किम जोंग उन हेदेखील सक्रिय झाले आहेत. या युद्धानंतर किम जोंग यांनी लगेच आपल्या देशातील शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा दौरा केला आहे. सोबतच त्यांनी या कारखान्यांनी दारु-गोळ्याचे उत्पादन वाढवावे, असा मोठा आदेश दिला आहे.
बॉम्ब तसेच दारुगोळा निर्माण करण्याची गती वाढवा
किम जोंग उन यांनी आपल्या अधिकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता कारखान्यांत बॉम्ब तसेच दारुगोळा निर्माण करण्याची गती वाढवावी, असं किम जोंग यांनी सांगितलं आहे. सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असं काहीजण म्हणत आहेत. त्यामुळे ज्या देशाकडे सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र, तोच देश भविष्यकालीन युद्धात तग धरू शकणार आहे. हीच बाब लक्षात घेता किम जोंग उन यांनी आपल्या प्रशासनाला थेट शस्त्रास्त्र उत्पादनाची गती वाढवण्याचा आदेश दिला आहे. उत्तर कोरियातील शासकीय माध्यम संस्था केसीएनएने तेथील शासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
किम जोंग उन यांनी शुक्रवारी मेटल प्रेसिंग अँड असेब्ली युनिट्सला भेट दिली. येथे गेल्यानंतर त्यांनी 2025 सालातील पहिल्या सहामाईत किती दारु-गोळ्याची निर्मिती झाली, याची माहिती घेतली. तसेच तिथल्या अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतलं. सध्याचे आधुनिक युद्ध लक्षात घेऊन अधिक शक्तिशाली दारु-गोळा तयार करायला हवा. तसेच उत्पादन क्षमता वाढवा असा आदेश त्यांनी दिला आहे.
20 हजारपेक्षा जास्त कंटेनर शस्त्र पुरवली
दरम्यान, गेल्या काही दिवसांत किम जोंग उन हे आपली सेना कशी मजबूत होईल, यावर जोर देताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील मेत्रीचे संबंध वृद्धींगत होताना दिसत आहेत. मे महिन्यात आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार उत्तर कोरियाने रिशियाला आतापर्यंत 20 हाजारांपेक्षा जास्त कंटेनर शस्त्रं रशियाला पाठवले आहेत.