मोठी बातमी! कोरोनाचा पहिला रुग्ण सापडताच उत्तर कोरियात लॉकडाऊन, किम जोंग उनकडून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा

मुंबई : उत्तर कोरियात पहिला कोरोना रूग्ण सापडताच लॉकडाऊनची (North Korea Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने (Kim Jong Un) आजपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. किम याला राष्ट्रीय आणीबाणी म्हटलंय. किम जोंग उनने अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय वाढवण्याचे आदेश दिले आहेत. […]

मोठी बातमी! कोरोनाचा पहिला रुग्ण सापडताच उत्तर कोरियात लॉकडाऊन, किम जोंग उनकडून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 12:48 PM

मुंबई : उत्तर कोरियात पहिला कोरोना रूग्ण सापडताच लॉकडाऊनची (North Korea Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने (Kim Jong Un) आजपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. किम याला राष्ट्रीय आणीबाणी म्हटलंय. किम जोंग उनने अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता दोन वर्षांनी प्योंगयांगमध्ये पहिला कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून कडक नियम जाहीर करण्यात आले आहेत. आज (गुरुवार) पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद करण्यात आली त्यानंतर आता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. प्योंगयांग शहरात अत्यंत संक्रमक ओमिक्रॉन विषाणूचे उप-प्रकार आढळून आल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. KCNA न्यूजच्या रिपोर्टनुसार, “ही देशातील सर्वात मोठी आपत्कालीन घटना घडली आहे.”

अहवालात म्हटलंय की, प्योंगयांगमधील लोकांना ओमायक्रॉन या कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. 8 मेला लक्षणं जाणवणाऱ्या लोकांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्याचा आता रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार सध्या एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने या संदर्भात वर्कर्स पार्टीची एक बैठक बोलावली. या या परिस्थितीविषयी चर्चा झाली. त्यानंतर आता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

किमने वर्कर्स पार्टीच्या बैठकीत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी. प्रशासनाने कोणत्या कामांकडे लक्ष द्यावं. कोणत्या उपाय योजनांमुळे हा संसर्ग आटोक्यात राहिल. शिवाय संक्रमण वाढल्यास कोणत्या उपाय योजना कराव्यात यावर चर्चा झाल्याची माहिती KCNA ने प्रसारित केली आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.