
War in Sea: वर्ष 2026 च्या सुरुवातीला नास्त्रेदमसच्या रहस्यमयी भविष्यवाणीची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. 16 व्या शतकात फ्रान्सचा ज्योतिषी मिशेल डी नास्त्रेदमसने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या समर्थकांचा दावा आहे की, चार शतकापूर्वी नास्त्रेदमसने जगाचे भाकीत मांडले आहे. सोशल मीडियासह जागतिक मीडियात त्याची अनेकदा चर्चा होते. या भविष्यावाण्यांच्या जगातील अनेक घडामोडींशी संबंध लावण्यात येतो. जगात अजून मोठे वादळ येण्याची शक्यता या फ्रान्सच्या ज्योतिषाने वर्तवली आहे. त्याच्या मते 2026 मध्ये जमिनीवरील युद्ध संपणार आणि पाण्यातील युद्धाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जग बुचकाळ्यात पडलं आहे. पण सध्या भारताच्या शेजारी सुरु असलेल्या हालचाली त्याचेच तर संकेत देत नाहीत ना?
समुद्रात युद्ध भडकणार?
चीन तैवान आणि आजूबाजूच्या समुद्रात मोठ्या हालचाली करत आहेत. अनेक युद्धवाहक नौका आणि विमानवाहू नौका, क्षेपणास्त्र असलेल्या युद्ध नौकांची तैवान जवळ भाऊगर्दी झालेली आहे. तिकडे जपानकडे चीनचे बारीक लक्ष आहे. तर उत्तर कोरिया सुद्धा चीनची भाषा बोलत आहे. सात जहाजांजवळ भीषण युद्ध सुरू होणार असं भाकीत नास्त्रेदमसने केले आहे. दक्षिण चीन महासागराशी संबंधित ही भविष्यवाणी असल्याचे म्हटले जाते. चीन, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेइ, इंडोनेसिया आणि फिलिपिन्समध्ये पूर्वीपासूनच तणाव वाढलेला आहे. त्यात या भाकिताने अनेकांची झोप उडवली आहे.
मधमाशांच्या फौजा येतील
नास्त्रेदमसने मधमाशांच्या फौजा येतील असे एक भाकीत नोंदवलेले आहे. त्यानुसार रात्रीतून या मधमाशांच्या फौजा हल्ला करतील. काहीजण याच्या संबंध आधुनिक छोट्या क्षेपणास्त्राशी जोडत आहेत तर काही जण याचा संबंध आधुनिक तानाशाह आणि सत्ताधीशांची जोडत आहेत. जगातील काही संघटनांमध्ये अनेक देश सहभागी आहेत. ब्रिक्स देशांविरोधात अमेरिका असा संबंध आहेत. त्याकडे सुद्धा ही भविष्यवाणी संकेत करत असल्याचे काहीचे म्हणणे आहे. त्यामुळे अमेरिकेविरोधात इतर देश असा सामना पाहायला मिळणार का, असा सवाल विचारल्या जात आहे. तर एका श्लोकात सात महिन्यांपर्यंत चालणाऱ्या युद्धाचा उल्लेख आहे. त्यात लाखो लोक मरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सूचना : शास्त्रज्ञ बाबा वेंगा अथवा नास्त्रेदमसची भाकीतं मानत नाहीत. हे सर्व दावे खोटे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ती एखाद्या प्रदेशाचं, देशाचं नाव घेऊन केलेली नाही तर या काळात अशा घटना घडू शकतात असा या भाकितातील दावा आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी तशी घटना जुळून येऊ शकतात.