
पाकिस्तानची खरी फसवणूक मोहम्मद अली जिना याने केली आहे. टू नेशन थेरी, द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांत मांडत त्याने पाकिस्तानची निर्मिती केली. 1947 मध्ये भारताचे विभाजन झाले. पाकिस्तानची निर्मिती झाली. भारतीय उपखंडात भारत आणि पाकिस्तान हे हिंदू आणि मुस्लिम राष्ट्र असल्याचा संदेश जिना याला द्यायचा होता. तर पाकिस्तानचे जनक म्हणून अजरामर व्हायचे होते. पण त्यामुळे या देशाचे मोठे नुकसान झाले. या देशातील लोकशाही ही लष्कराची बाहुली झाली. पंतप्रधान आणि इतर यंत्रणा या देखाव्यासाठीच आहेत. इथे सत्ता ही लष्कराच्या हातात आहे. पाकिस्तानमध्ये यापूर्वी पण तख्तापालट झाले आहे. आता शरीफ सरकार पण औटघटकेचेच असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुनीरला हटवून दुसराच तानाशाह येणार
पाकिस्तानमध्ये मार्शल लॉचा मोठा इतिहास आहे. येथील सरकारचे भविष्य कायम लष्कराच्या हाती आहे. 1958. 1977, 1999 मध्ये त्याची उदाहरणं जगाने पाहिली आहेत. सध्या लष्कराचा दबदबा स्पष्ट पणे दिसत आहे. सध्याचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याच्याविरोधात पाकिस्तानमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यापूर्वीच्या इम्रान खान सरकारशी पण त्याचे खटके उडाले होते. भारताने पाकिस्तानला नमवले तर पाकिस्तानमध्ये मुनीर याला कैदेत टाकून दुसराच एखादा लष्करी अधिकारी तानाशाहा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सरकार आणि लष्कराच्या मुनीरमध्ये ताण-तणाव स्पष्टपणे समोर आला आहे.
शरीफ सरकार पण धोक्यात
भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून वार केला. तर गेल्या तीन दिवसांपासून भारतीय ड्रोन आणि मिसाईलने पाकिस्तानला जेरीस आणले आहे. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिमचे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. जर भारताने पाकिस्तानला या ताज्या हल्ल्यात शिकस्त दिली तर लष्करात जसा खांदेपालट होईल. तसेच शरीफ सरकार सुद्धा संकटात येईल. लष्करी अधिकारी सत्ता काबीज करण्याची शक्यता दिवसागणिक प्रबळ होत आहे. शरीफ सरकार त्यामुळेच अमेरिकेला मध्यस्थीसाठी गळ घालत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर पाकिस्तानचे तीन तुकडे
1971 मध्ये भाषेच्या आधारावर पूर्व बंगाल, आताचा बांग्लादेश पाकिस्तानातून बाहेर पडला. त्यासाठी भारताने मोठी मदत केली. त्यावेळच्या युद्धात पाकिस्तानच्या 90 हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती. बांग्लादेश मुक्तीवाहिनीला भारताने मोठी मदत केली होती. आता जर पाकिस्तान आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत कमजोर झाला आहे. बलुचिस्तानमधील नागरिकांनी त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तुनख्वा हे तीन देश तयार होण्याची शक्यता आहे.