
पाकिस्तानच्या खोटारडेपणाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. पाकिस्तानने आपले सैन्य भारतापेक्षा श्रेष्ठ अलस्याचे दाखविण्यासाठी भारताची राफेल विमाने पाडल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारतीय राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा खोटा अहवाल प्रकाशित केला होता मात्र आता फ्रान्सने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे.
जिओ टीव्हीच्या अहवालात फ्रेंच नौदल हवाई तळ लँडिव्हिसियोचे कमांडर जॅक लॉने यांनी भारतीय राफेल पाडल्याची कबुली दिली होती असा दावा करण्यात आला होता. मात्र आता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आला आहे. कारण फ्रेंच नौदलात या नावाचा कोणताही कमांडर नाही अशी माहिती समोर आली आहे. नौदलातील कमांडरचे नाव यवान लॉने असे आहे.
फ्रेंच नौदल मरीन नॅशनलने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे. नौदलाने जिओ टीव्हीच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला करत तो खोटा असल्याचे म्हटले आहे. या अहवालात अत्यंत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती असल्याचे नौदलाने म्हटले आहे. तसेच कमांडर यवान लॉने यांनी असे विधान केलेले नाही आणि पाकिस्तानने ते छापण्याची परवानगीही घेतलेली नाही.
फ्रेंच नौदलाने स्पष्टीकरण देताना म्हटले की, आम्ही कमांडरला ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल पाडण्याच्या विधानाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी म्हटले की, मी भारतीय विमान पाडले असल्याचे सांगितले नाही. फ्रेंच नौदलाने असेही म्हटले की या अहवालात कॅप्टन लॉने यांचे पद आणि जबाबदाऱ्यांबाबत चुकीची माहिती देण्यात आलेली आहे.
भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या कारवाईत पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्यात भारतीय सैन्याला यश आले होते. मात्र पाकिस्तानने आपला पराभव लपवण्यासाठी खोटारडे दावे केले होते. पाकिस्तानने परदेशी माध्यमांसमोर भारतीय राफेल विमान पाडले असल्याचे म्हटले होते. मात्र भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवले होते. या कारवाईत भारताने पाकिस्तानमधील 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.