भारत-पाकमध्ये मध्यस्थीचा ट्रम्प यांचा दावा, पंतप्रधान मोदींनी थेट सुनावले, 35 मिनिटांच्या संभाषणात काय झाले
PM Modi-Donald Trump Conversion : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोवर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीच्या ट्रम्प यांच्या दाव्याची हवाच काढून टाकली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 35 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भारताने कोणाची मध्यस्थी स्वीकारली नाही. ती स्वीकारत नाही आणि भविष्यातही ती स्वीकारणार नसल्याचे खडेबोल सुनावले. ट्रम्प यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावात त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर शिक्कामोर्तब केले. आपल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याचा ट्रम्प यांच्या दाव्याची मोदींनी हवाच काढून टाकली. ट्रम्प हे दोन्ही देशातील शांततेचे श्रेय लाटले होते. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला केला चढवला होता. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्यासमोर झुकल्याचा दावा केला होता. मोदी सरेंडर झाल्याची विखारी टिप्पणी सुद्धा गांधी यांनी केली होती.
कॅनडात दोन्ही नेत्यांमध्ये नाही झाली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यात कॅनाडामधील G7 समिट मध्ये भेट आणि चर्चा होणार होती. पण इस्त्रायल आणि इराण यांच्या तणावामुळे ट्रम्प यांनी हा दौरा आटोपता घेतला. ते अमेरिकेला रवाना झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये भेट होऊ शकली नाही. त्यानंतर ट्रम्प यांच्या आग्रहावरून दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून संवाद झाला. ही चर्चा 35 मिनिटे चालली. 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राष्ट्रपती ट्रम्प यांनी फोनवरून पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून संवदेना व्यक्त केली होती. तर दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. 22 एप्रिल रोजीच्या हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधातील कारवाई करण्याचा त्याचा अधिकार आणि दृढसंकल्प जगाला दाखवून दिला आहे, असे मोदी यांनी ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 6-7 मे रोजी भारताने पाकिस्ता आणि पीओकेमध्ये केवळ दहशतवादी ठिकाणेच लक्ष्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या गोळीचे उत्तर गोळ्याने देण्यात येईल असे पंतप्रधानांनी ठणकावले. भारताच्या सडेतोड उत्तरामुळचे पाकिस्तानला भारताने सैन्य कारवाई थांबवावी यासाठी विनंती करावी लागले असे मोदी म्हणाले.
ट्रम्प यांच्या दाव्याची काढली हवा
भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावात मध्यस्थी केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध विराम झाल्याचा त्यांनी दावा केला. आपल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याचा ट्रम्प यांच्या दाव्याची मोदींनी या चर्चेदरम्यान हवाच काढून टाकली. ट्रम्प हे दोन्ही देशातील शांततेचे श्रेय लाटले होते. या संपूर्ण घटनाक्रमात, कधीही कोणत्याही स्तरावर भारत-अमेरिका व्यापारी करार वा अमेरिकेद्वारे भारत आणि पाकिस्तानात मध्यस्थीविषयी चर्चा झाली नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
