AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमचे युद्ध इराणसोबत नाही, आम्हाला फक्त…,’ हल्ल्यानंतर अमेरिकेने सूर बदलला? वाचा…

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुसंवर्धन केंद्रांवर हल्ला केला. मात्र आता इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेरिकेचा सूर बदलला असल्याचे दिसत आहे.

'आमचे युद्ध इराणसोबत नाही, आम्हाला फक्त...,' हल्ल्यानंतर अमेरिकेने सूर बदलला? वाचा...
USA on War
Updated on: Jun 22, 2025 | 10:56 PM
Share

अमेरिकेने इराण आणि इस्रायलच्या युद्धात उडी घेतली असून इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुसंवर्धन केंद्रांवर हल्ला केला. यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. कारण इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे. मात्र आता इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेरिकेचा सूर बदलला असल्याचे दिसत आहे.

अमेरिका इराणशी युद्ध करत नाही…

अमेरिकेने इराणवर हल्ला केला, यानंतर बोलताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी म्हटले की, ‘अमेरिका इराणशी युद्ध करत नाही, आम्ही इराणच्या अणुकार्यक्रमाविरुद्ध लढत आहोत. आमचे ध्येय इराणचा अणुकार्यक्रम संपवणे हा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे पडला आहे. इराणला आता अणुशस्त्रे विकसित करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.’

इराणमध्ये सैन्य पाठवायचे नाही

पुढे बोलताना जेडी व्हान्स म्हणाले की, ‘आम्हाला इराणमध्ये सत्ता बदल नको आहे. आमचे ध्येय फक्त अणुकार्यक्रम संपवणे आहे. आम्हाला दीर्घकालीन उपायासाठी इराणशी चर्चा करायची आहे. अमेरिकेचा जमिनीवर सैन्य पाठवण्याचा कोणताही इरादा नाही. इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करत नाही, त्यामुळे अमेरिकेला लष्करी कारवाई करावी लागली.’

इराणने अमेरिकेवर हल्ला केला तर…

जेडी व्हान्स यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘जर इराणने अमेरिकेवर हल्ला केला तर त्यांना योग्य उत्तर मिळेल. आम्ही इराण राष्ट्रावर हल्ला केलेला नाही. आम्ही कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केलेला नाही. आम्ही त्या तीन अण्वस्त्र सुविधांव्यतिरिक्त इतर कोणत्याही लष्करी तळावर हल्ला केलेला नाही.’

इराणचा आक्रमक पवित्रा

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेत इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणकडून इस्रायलच्या दिशेने किमान 30 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेम या शहरांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलच्या अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी जनतेला होम फ्रंट कमांडच्या सूचनांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

आज इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा 10 वा दिवस आहे. या युद्धात दोन्ही देशांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे. पण दोन्ही देश अजूनही थांबायला तयार नाहीत. दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची शक्यता कमी आहे, मात्र यामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढत आहे.

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान.
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल.
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली.
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी.
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्....
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले.
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती.
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ.
अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच
अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच.