भारत-पाकिस्तान युद्धाची जगाला चिंता, अचानक मुस्लिम देश झाला अ‍ॅक्टिव्ह; सर्वात आधी ‘ही’ गोष्ट करणार

सीमेवर काश्मिरच्या पहलगाम अतिरेकी हल्ल्यावरुन युद्धाचे ढग जमा झाले असताना पाकिस्तानच्या मदतीला मुस्लीम देश धावले आहेत.

भारत-पाकिस्तान युद्धाची जगाला चिंता, अचानक मुस्लिम देश झाला अ‍ॅक्टिव्ह; सर्वात आधी ही गोष्ट करणार
| Updated on: May 05, 2025 | 6:16 PM

भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धाचे ढग जमा झालेले असताना आहे. या पार्श्वभूमीवर आता नवी दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुस्लीम देश पाकच्या मदतीला धावले आहेत. भारत आणि पाकिस्तान युद्धाचा भडका उडू शकतो म्हणून शिष्टाई करण्यासाठी आता इराणने पुढाकार घेतला आहे.

काश्मीरमध्ये पहलगामवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर अण्वस्त्रधारी प्रतिस्पर्धी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, इराणचे परराष्ट्रमंत्री सोमवारी एक दिवसाच्या दौऱ्यासाठी इस्लामाबादला पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तानला त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी   पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारताने दिले आहेत. जे इस्लामाबादने नाकारले असून आपणही दहशतवादाचे बळी आहोत असे नेहमीचे तुणतुणे वाजवले आहे. भारत मोठी लष्करी कारवाई करण्याचा विचार करीत आहे, ज्यामुळे दोन्ही शेजारी देशांमध्ये युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे, अशी “विश्वसनीय माहिती” आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे..

वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची नवी दिल्लीच्या दौऱ्याआधी सोमवारी इस्लामबादच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर पाकिस्तानला पोहचले आहेत. अराघची यांचा दौरा २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर प्रथमच पाकिस्तानला पोहचले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या बातमीनुसार अराघची यांनी उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळासोबत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्या सोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २२ एप्रिल रोजी २६ जणांचा मृत्यू झाला होता. साल २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात भीषण हल्ला म्हटला जात आहे.