Pahalgam Attack Mastermind : इंशाअल्लाह ये दरिया भी हमारे होंगे, इनके डैम भी…पहलगामच्या मास्टरमाइंडची भारताला पुन्हा धमकी
Pahalgam Attack Mastermind : “इंशाअल्लाह.. दरिया, डॅम, कश्मीर सबकुछ हमारे होंगे” सैफुल्लाह कसूरीचे हे शब्द ऐकून असं वाटतय, त्याने आपल्यासोबत हाफिजला सुद्धा समुद्रात बुडवण्याच स्वप्न पाहिलय.

पहलगामचा मास्टरमाइंड दहशतवादी सैफुल्लाह कसूरीने PM मोदींच नाव घेऊन भारताला धमकी दिली आहे. “इंशाअल्लाह.. दरिया, डॅम, कश्मीर सबकुछ हमारे होंगे” सैफुल्लाह कसूरीचे हे शब्द ऐकून असं वाटतय, त्याने आपल्यासोबत हाफिजला सुद्धा समुद्रात बुडवण्याच स्वप्न पाहिलय. सैफुल्लाह कसूरी सुद्धा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड पैकी एक आहे. ‘इंशाअल्लाह’ बोलून त्याने सिंधु नदी आणि जम्मू-कश्मीरवरुन भारताला धमकी देण्याची हिम्मत केलीय. सैफुल्लाह कसुरीने भारताने निलंबित केलेला सिंधु जल करार आणि जम्मू-काश्मीवरुन गरळ ओकली.PM मोदी यांचं नाव घेऊन भारताला धमकी देण्याची चूक केली. सैफुल्लाह म्हणाला की “ती वेळ जवळ येतेय. इंशाअल्लाह हे समुद्र आमचे असणार. यांचे डॅम सुद्धा आमचे असतील. हे सर्व जम्मू-कश्मीर आमचं असेल आणि भारताला किंमत चुकवावी लागेल”
‘पाकिस्तानची सुरक्षा कशी करायची हे आम्हाला माहित आहे. शत्रुशी बदला घेणं सुद्धा आम्हाला येतं’ असं सैफुल्लाह म्हणाला. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय सैन्य दलांनी मुरीदकेमधील लश्करच हेडक्वार्टर उद्धवस्त केलं. 7 मे रोजी भारताच्या ब्राह्मोस मिसाइलने लष्करचे अनेक दहशतवादी मारले. पहलगामचा हिशोब चुकवावा लागणार हे भारताने स्पष्ट केल्यानंतर सैफुल्लाह कसूरी हा तोच दहशतवादी आहे, जो बोललेला माझा या हल्ल्याशी संबंध नाही.
त्याचा शेवट 100 दहशतवाद्यांसारखाच होईल
ऑपरेशन सिंदूरनंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, यापुढे पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला असच प्रत्युत्तर दिलं जाईल. दहशतवादी सैफुल्लाह कसूरीने आपल्या विद्धवंसाची SCRIPT स्वत: लिहिली आहे. सैफुल्लाहने आपले शब्द खरे करुन दाखवण्याचा विचार जरी केला, तरी त्याचा शेवट 100 दहशतवाद्यांसारखाच होईल, जे ऑपरेशन सिंदूरच्यावेळी मारले गेले.
भारताकडे दयेची भीक मागितलेली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाच वातावरण होतं. बदला घेण्याची मागणी सुरु होती. सैन्याने दहशतवाद्यांवर प्रहार करण्याची पूर्ण तयारी केलेली. सरकार आपल्या पातळीवर योजना बनवत होती. त्यावेळी भयभयीत सैफुल्लाह कसूरी बरोबर दोन दिवसांनी क्षमा याचना करत होता. पहलगाम हल्ल्याशी आपला संबंध नाही असं तो म्हणत होता. सैफुल्लाहने त्यावेळी भारताकडे दयेची भीक मागितलेली.
