AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबरी मशि‍दीची पहिली विट…पाकिस्तान महिला खासदाराचे फूत्कार, दहशतवाद्यांचे सत्य समोर आल्याने ओकली गरळ

Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी, दहशतवाद, धर्मवेड्यांना पोसणारे पाकडे सध्या जास्त वटवट करत आहेत. त्यांना युद्धाची खुमखुमी आहे. बिलावल भुट्टो, मरियमनंतर आता पाकिस्तानच्या या बिनडोक महिला खासदाराने अकलेचे तारे तोडले आहेत.

बाबरी मशि‍दीची पहिली विट...पाकिस्तान महिला खासदाराचे फूत्कार, दहशतवाद्यांचे सत्य समोर आल्याने ओकली गरळ
पाकड्यांच्या वक्तव्यांचा वीटImage Credit source: गुगल
| Updated on: May 01, 2025 | 8:15 AM
Share

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केला हे उघड झाले आहे. त्याचे भरभक्कम पुरावे सुद्धा भारताच्या तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. दहशतवादी, दहशतवाद, धर्मवेड्यांना पोसणारे पाकडे सध्या जास्त वटवट करत आहेत. त्यांना युद्धाची खुमखुमी आहे. बिलावल भुट्टो, मरियमनंतर आता पाकिस्तानच्या या बिनडोक महिला खासदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सैन्य दलाला कारवाईची मुभा दिल्याने पाकड्यांचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे नेते अस्वस्थ दिसून येत आहे. ते रात्रंदिवस बरळत सुटले आहे. त्यांना झोपेत सुद्धा भारतीय लष्कर चालून आल्याचे स्वप्न पडत आहेत.

महिला खासदार काय बरळली

पाकिस्तानची महिला खासदार पलवाशा खान हिने बरळणाऱ्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. ती पाकिस्तान पीपल्स पार्टीची खासदार आहे. संसदेत बोलताना या बयेचे ताळतंत्र पूर्ण सुटले. तिच्यातील धर्मवेडेपणा उफाळून आला. पाकड्यांचे खायचे वांधे असताना त्यांच्या डोक्यात धर्माचे वेडं संचारले आहे. “अयोध्येत बाबरी मशीद उभी करू आणि पाकिस्तानच्या लष्कराचा प्रत्येक सैनिक त्या मशिदीचा पाया स्वत: विटा रचून भरेल. लष्करप्रमुख असीम मुनीर पहिली अजान देतील.” असे आगीत तेल ओतणारे वक्तव्य या महिला खासदाराने केले आहे. तिच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला गेला आहे.

दिल्ली रक्ताच्या थारोळ्यात असेल

इतर नेत्यांप्रमाणेच पलवाशा खान सुद्धा पोकळ धमक्या देण्यात पुढे आली आहे. “जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीतल्या लाल किल्ल्याचं मैदान रक्ताने भरून जाईल.” असा विखार तिने पसरवला. “पाकिस्तान केवळ आपल्या ७ लाख सैनिकांवर नाही, तर २५ कोटी देशभक्त नागरिकांवर विश्वास ठेवतो.” असे पलवाशा म्हणाली.

कोण आहे पलवाशा खान?

पलवाशा खान ही पाकिस्तान पीपल्स पार्टीची खासदार आहे. 2008 मध्ये पंजाबमधील राखीव जागेवरून ती पहिल्यांदा खासदार झाली. 2016 मध्ये ISI चे माजी संचालक जहीर उल इस्लाम यांच्याशी तिने विवाह केला. तिच्यासह पाकिस्तानमधील अनेक नेते सध्या रात्रंदिवस बरळत असल्याचे समोर येत आहे. ते भडक विधानं करत आहेत.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत