Pakisatan Aghanistan Clash : पाकिस्तानी सैनिकांना पळवून पळवून मारलं; मुनीरची इज्जत गेली, व्हिडीओची जगभरात चर्चा

सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. तालिबानी सैनिकांनी मात्र पाकिस्तानला पळता भूई थोडी करून टाकली आहे. त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Pakisatan Aghanistan Clash : पाकिस्तानी सैनिकांना पळवून पळवून मारलं; मुनीरची इज्जत गेली, व्हिडीओची जगभरात चर्चा
pakistan and afghanistan clash
| Updated on: Oct 15, 2025 | 8:10 PM

Pakistan And Afghanistan Clash : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे. हे दोन्ही देश एकमेकांवरही जोरदार हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले आहेत. ताज्या माहितीनुसार बुधवारी (15 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर पुन्हा मोठा संघर्ष पाहायला मिळाला. दक्षिण अफगाणिस्तानातील स्पिन बोल्डक जिल्ह्यात रात्रभर ही लढाई चालू होता. असे असतानाच आता दोन्ही देशांमधील संघर्षाचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओत तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना पळता भूई थोडी करून टाकली आहे. तालिबानने पाकिस्तानचा एक टँक ताब्यात घेतल्याचा हा व्हिडीओ आहे.

स्पिन बोल्डक भागात मोठा संघर्ष

स्पिन बोल्डक जिल्ह्यात 15 ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा संघर्ष घडून आला. तालिबानने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानने स्पिन बोल्डक भागावर हवाई हल्ले केले. या संघर्षात दोन्ही देशांचे नुकसान झाले. पाकिस्तानच्या दाव्यानुसार त्यांच्या सुरक्षा जवानांनी स्पिन बोल्डक क्षेत्रात कमीत कमी 15 ते 20 सुरक्षा जवानांना ठार केलं आहे. न्यूज एजन्सी एफपीने दिलेल्या रिपोर्टनुसार दक्षिण अफगाणिस्तानातील स्थानिक प्रवक्ते अली मोहम्मद हकमल यांनीदेखील पाकिस्तानच्या या हल्ल्याची पुष्टी केली आहे. स्पिन बोल्डक येथील जिल्हा रुग्णालयानेही पाकिस्तानच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगितले आहे.

पाकिस्तानने सैनिकांवर गोळीबार केल्याचा दावा

पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजीदेखील पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिमी सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. पाकिस्तानी शासकीय माध्यमांनी तालिबानी सैनिकांनी कोणतेही कारण नसताना पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या या कृत्याला उत्तर म्हणून पाकिस्तानी लष्कराने अफगाणी टँक आणि सैन्याची टिकाणं यांना नुकसान पोहोचवल्याचं सांगितलं जात आहे.

पाकिस्तानी सैनिकांना पळता भुई थोडी

तर दुसरीकडे, अफगाणिस्ताननेही आम्ही पाकिस्तानच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिले, असे सांगितले आहे. सोबतच काही व्हिडीओ शेअर करून पाकिस्तानी टँक, शस्त्र, लष्करी ठिकाणे ताब्यात घेतल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. आम्ही पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना उद्ध्वस्त करून टाकल्याचाही दावा तालिबानने केला आहे. तालिबानने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी रणगाड्याला ताब्यात घेतल्याचे दिसत आहे. हा रणगाडा ते सोबत घेऊन जात असल्याचेही दिसत आहे. दरम्यान, आता अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील हा संघर्ष कुठपर्यंत वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.