AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan vs Afghanistan : फार मोठी सैन्य ताकद नसूनही अफगाण तालिबानने पाकिस्तानला कुठे-कुठे धुतलं, त्याची माहिती आली समोर

Pakistan vs Afghanistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्य क्षमतेचा विचार केल्यास तालिबानकडे फार ताकद नाहीय. मात्र, तरीही तालिबानी सैन्याने सीमेवरच्या हिंसक संघर्षात कुठल्या-कुठल्या चौक्यांवर पाकिस्तानला धुतलं, त्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan vs Afghanistan : फार मोठी सैन्य ताकद नसूनही अफगाण तालिबानने पाकिस्तानला कुठे-कुठे धुतलं, त्याची माहिती आली समोर
pakistan afghanistan border clashImage Credit source: Muhammed Semih Ugurlu/Anadolu Agency via Getty Images
| Updated on: Oct 13, 2025 | 8:42 AM
Share

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर रात्रभर भीषण संघर्ष झाला. यात 23 पाकिस्तानी सैनिक तर 200 पेक्षा पण जास्त तालिबानी सैनिकांचा मृत्यू झाला. रविवारी पाकिस्तानी सैन्याने हा दावा केला. दुसरीकडे तालिबानने त्यांच्या कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केलाय. या हिंसक झडपांनंतर दोन्ही देशात तणाव आणखी वाढला आहे. कारण दोन्ही देशांनी परस्परांवर सीमापार हल्ले केल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यांवर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही, कारण पाकिस्तानी आर्मीची प्रोपेगेंडा मशीन ISPR ने ऑपरेशन सिंदूरवेळी सुद्धा असेच अनेक खोटे दावे केले होते. तालिबानने अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दिर आणि चितरल (खैबर पख्तूनख्वा प्रांत) बरामचा (बलूचिस्तान) येथील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केलं. या ठिकाणी अफगाण तालिबानकडून पाकिस्तानला मार पडला.

पाकिस्तानचा दावा काय?

19 अफगाण सैन्य चौक्या आणि दहशतवादी तळ ताब्यात घेतल्याचं पाकिस्तानी सैन्याने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. अफगाण तालिबानच्या कारवाईला दिलेले हे प्रत्युत्तर आहे, असं पाकिस्तानच म्हणणं आहे. आमच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, 30 जखमी आहेत, असा काबूलने दावा केलाय. 11 आणि 12 ऑक्टोंबरच्या रात्री अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान या दोघांनी मिळून पाक-अफगाण सीमेवर हल्ला केला. आम्ही कुठलीही चिथावणीखोर कृती केली नव्हती, असा पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे.

‘दहशतवाद्यांच्या नीच कारस्थानाचा हा भाग’

पाकिस्तानी आर्मीनुसार, हे भ्याड हल्ले आहेत. अफगाण तालिबानने सीमेवर गोळीबार आणि छोट्या प्रमाणात जमिनी हल्ले केल्याच पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे. सीमा क्षेत्र अस्थिर करणं आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणं हा या हल्ल्यांमागचा उद्देश आहे. पाकिस्तानी आर्मीनुसार, दहशतवाद्यांच्या नीच कारस्थानाचा हा भाग आहे.

‘आमचं सशस्त्र सैन्य पूर्णपणे सज्ज आहे’

तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सकाळी हल्ल्यांची पुष्टि केली. आमच्या सैन्याने प्रत्युत्तराची कारवाई करताना यशस्वी ऑपरेशन केलं असं तालिबानने म्हटलं आहे. “पाकिस्तानने पुन्हा अफगाण सीमेच उल्लंघन केलं, तर आमचं सशस्त्र सैन्य पूर्णपणे सज्ज आहे, कठोर प्रत्युत्तर मिळेल” असा तालिबानने इशारा दिला आहे. अफगाणि फौजांनी पाकिस्तानच्या अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दिर और चितरल (खैबर पख्तूनख्वा प्रांत) तसच बरामचा (बलूचिस्तान) मधील पाकिस्तानी चौक्यांना टार्गेट केलं.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.