
भारताने पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिलं आहे. भारतीय वायू रक्षा प्रणालीने पाकिस्तानच्या मिसाइल आणि ड्रोनला हवेतच नेस्तनाबूत केलं आहे. पाकिस्तानकडून भारताला चिथावण्याचा प्रयत्न करण्यता आला. त्यामुळे भारतीय नौदलाने कराची पोर्टला निशाणा बनवून मोठा हल्ला केला. काल रात्री तर भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. तर पाकिस्तानने गोळीबार करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे. पाकच्या या हल्ल्याच्या बदल्यात भारताने लाहोर. कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर, बहावलपूर आणि कोटलीवर जोरदार हल्ला चढवला. भारताच्या या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताने पाकिस्तानच्या ज्या शहरांवर हल्ला केला ती शहरं ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. या शहरांचं एक वेगळं महत्त्व आहे. नेमकी या शहरांची काय खासियत आहे? ...