AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : खरंच त्यांनी घुसून मारलं, पाकिस्तानी नागरिकाची कबुली, पाकची अक्षरश: इज्जत काढली, VIDEO

Operation Sindoor : 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं, त्याची कबुली एका पाकिस्तानी नागरिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्याने अक्षरक्ष: पाकिस्तानची इज्जत काढली आहे. पाकिस्तानकडून सतत जे दावे केले जातात, ते किती पोकळ आहेत हे दाखवून दिलय.

Operation Sindoor : खरंच त्यांनी घुसून मारलं, पाकिस्तानी नागरिकाची कबुली, पाकची अक्षरश: इज्जत काढली, VIDEO
Pakistani National
| Updated on: May 08, 2025 | 11:25 AM
Share

भारताने 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर केलं. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी महिलांसमोर त्यांच्या पतीची हत्या केली होती. या दहशतवादी कृत्याचा बदला म्हणून या प्रतिहल्ल्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं होतं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून 9 ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आले. पाकिस्तानात आतमध्ये खोलवर हे हल्ले करण्यात आले. भारताने एकाच हल्ल्यात सतत त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या प्रमुख दहशतवादी संघटनांची मुख्यालय नष्ट केली. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरच कुटुंब या हल्ल्यात संपलं.

भारताने पाकिस्तानवर केलेला हा प्रहार किती घातक होता, हे तिथल्याच एका माणसाकडून जाणून घ्या. “काल रात्री भारताने पाकिस्तानवर 24 मिसाईल डागले. हैराण करणारी बाब म्हणजे सर्व मिसाईलनी टार्गेटवर जाऊन हिट केलं. भारताने जे टार्गेट सेट केलेलं ते अचिव्ह केलं. यापेक्षा हैराण करणारी बाब म्हणजे पाकिस्तानच्या डिफेन्स सिस्टिमला एकाही मिसाईलला रोखण जमलं नाही” असं या पाकिस्तानी नागरिकाने सांगितलय.

नशीब अजून भारताने…

“सर्व हल्ले रोखण्यात आपण अपयशी ठरलो. जे टार्गेट त्यांनी ठरवलेलं ते अचिव्ह केलं. ते म्हणतात घुसून मारलं, खरच त्यांनी घुसून मारलं. एकही मिसाईल आपण रोखू शकलो नाही” असं हा पाकिस्तानी नागरिक म्हणाला. “असं म्हणू नका भारताच कौतुक करतोय. जे सत्य आहे ते आहे. आपण ऐकत आलोय, इराण 200, 400 मिसाइल फायर करतं. एखादं इस्रायलमध्ये जाऊन पडतं. बाकी मिसाईल्सना इस्रायल इंटरसेप्ट करतं. इतकी मजबूत सिस्टिम आहे त्यांची. भारताने 24 मिसाइल डागले आणि आपण एकही रोखू शकलो नाही. नशीब अजून भारताने सैन्य तळांना लक्ष्य केलेलं नाही” असं हा पाकिस्तानी नागरिक म्हणाला.

पाकिस्तानात फेक न्यूज

“पाकिस्तान मीडिया आणि सोशल मीडियावर रात्रभर अफवा पसरवल्या जात होत्या. भारताची फायटर जेट्स पाडली. सैन्य मुख्यालयाला टार्गेट केलं. हे सर्व खोटं आहे. सर्व फोटो बघितले. काही आठ महिने आधीचे, तीन वर्ष जुने फोटो आहेत. फेक न्यूज आहे” अशा शब्दात या पाकिस्तानी नागरिकाने आपल्याच देशाची पोल-खोल केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.