Sarabjits murderer Killed : सरबजीतच्या मारेकऱ्याचा गेम होताच पाकिस्तानचा तिळपापड, भारताबद्दल म्हटलं…

Sarabjits murderer Killed : पाकिस्तानात सध्या भारताच्या विरोधकांना वेचून, वेचून संपवलं जातय. अमीर सर्फराज ऊर्फ तांबाने घराचा दरवाजा उघडताच हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Sarabjits murderer Killed : सरबजीतच्या मारेकऱ्याचा गेम होताच पाकिस्तानचा तिळपापड, भारताबद्दल म्हटलं...
Sarabjits murderer Killed
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 10:57 AM

पाकिस्तानी तुरुंगात सरबजीत सिंग या भारतीय कैद्याची 2013 साली हत्या करण्यात आली होती. सरबजीत सिंग यांची सुटका करावी यासाठी त्यांच्या बहिणीने बरेच प्रयत्न केले. सरबजीत सिंग यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं होतं. भारताकडूनही सरबजीत यांच्या सुटकेसाठी बरेच प्रयत्न झाले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. एकदिवस पाकिस्तानी तुरुंगात सरबजीत यांची अत्यंत निदर्यतेने हत्या करण्यात आली. आता पुन्हा हा विषय चर्चेत का आला? त्यामागे एक खास कारण आहे. पाकिस्तानी तुरुंगात अमीर सर्फराज ऊर्फ तांबा याने सरबजीत यांची हत्या केली होती. अमीर सर्फराज ऊर्फ तांबा आयएसआयचा हस्तक होता. याच अमीर सर्फराजची आता पाकिस्तानात अज्ज्ञात आरोपींनी हत्या केली आहे. या प्रकरणात आता पाकिस्तानने भारतावर संशय व्यक्त केला आहे. अमीर सर्फराजच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे, असं पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री मोहसीन नक्वी म्हणाले.

अमीर सर्फराज लाहोर येथे राहतो. बाईकवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. “पाकिस्तानात झालेल्या चार हत्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. कुठलही पुढच वक्तव्य करण्याआधी तपासाचा काय निष्कर्ष येतो, त्यासाठी थांबलो आहे” असं मोहसीन नक्वी म्हणाले. या आरोपांवर भारताने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानात सध्या भारताच्या विरोधकांना वेचून, वेचून संपवलं जातय. अमीर सर्फराज ऊर्फ तांबाने घराचा दरवाजा उघडताच हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विटा आणि लोखंडी रॉडने सरबजीत यांची हत्या

तांबाचा भाऊ जुनैद सर्फराजच्या तक्रारीवरुन लाहोर पोलिसांनी दोन अज्ज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवलाय. पंजाब सरकारने हे प्रकरण दहशतवादविरोधी पोलीस पथकाकडे सोपवलं आहे. तांबा आणि त्याचा साथीदार मुदासीर मुनीर यांनी एप्रिल 2013 मध्ये कोट लखपत तुरुंगात सरबजीत सिंगवर विटा आणि लोखंडी रॉडने हल्ला केला होता. सरबजीत सिंगला हेरगिरी आणि बॉम्बस्फोटाच्या कटात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2001 सालच्या संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुच्या शिक्षेची अमलबजावणी केल्यानंतर दोन महिन्यांनी सरबजीतची हत्या करण्यात आली होती. 14 डिसेंबर 2018 रोजी लाहोरच्या सत्र न्यायालयाने तांबा आणि मुनीरची सरबजीत सिंगच्या हत्येच्या आरोपातून सुटका केली होती. तांबाच वय 45 होतं. तो अविवाहित होता. भावासोबत तो राहत होता.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.