AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

पाकिस्तान इराण-अमेरिका युद्धविरामाचे श्रेय स्वतःकडे घेत आहे. पाकने त्यांच्या 3 नेत्यांच्या कथित 'प्रभावी मुत्सद्देगिरी'साठी नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. अंतर्गत संकटांना सामोरे जात असतानाही, पाकिस्तान जागतिक स्तरावर 'शांतताप्रिय' प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, आंतरराष्ट्रीय मान्यता व पुरस्कारासाठी त्यांची ही धडपड आहे.

संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात... नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?
पाकिस्तानची अजब मागणीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 10, 2026 | 1:04 PM
Share

भारतात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान सध्या इराण-अमेरिका युद्धविरामाचं श्रेय लाटण्यात मग्न आहे. गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका, इस्रायल युद्धानंतर अखेर बुधवारी युद्धविरामाची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी युद्धविरामाची घोषणा तर केलीच पण पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या आवाहनानंतर आपण 15 दिवसांच्या शस्त्रसंधीबद्दल सहमती झाली, असंही त्यांनी नमूद केलं होतं. त्यानंतर पाकच्या पंतप्रधानांनीही या युद्धविरामात आपली मोलाची भूमिका असल्याचे सांगत, शांतीदूत असल्याचे म्हणत, त्यांनी स्वत:च पाठीवर कौतुकाची थाप मारली. एवढंच नव्हे तर आता पाकिस्तानतर्फे 1 नाही त्यांच्या तीन लोकांना नोबेल देण्याची मागणी केली जात आहे.

तीन नोबेल द्या 

काल त्यांनी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि आर्मी चीफ असीम मुनीरना शांततेचं नोबले देण्याची मागणी केली होती, मात्र आता पाककडून आणखी एक व्यक्तीसाठी नोबेलची मागणी होत्ये. खरंत, पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेत एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि आता परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनाही ‘नोबेल शांतता पुरस्कारा’साठी नामांकित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे मुख्य प्रतोद राणा मोहम्मद अर्शद यांनी सभागृहात हा ठराव मांडला. या ठरावाच्या मजकुरानुसार, सभागृहाने देशाच्या नेतृत्वाच्या “प्रभावी मुत्सद्देगिरी”बद्दल प्रशंसा केली. या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं ठरावात म्हटलं आहे. तसेच या ठरावात विशेषतः इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा उल्लेख करत तो जागतिक शांततेसाठी एक गंभीर धोका बनल्याचं म्हटलं होतं.  पाकच्या या तीन सर्वोच्च पाकिस्तानी नेत्यांनी हे आंतरराष्ट्रीय संकट टाळण्यात आणि युद्धविराम सुरक्षित करण्यात “महत्त्वाची भूमिका” बजावली असं या सभेतील लोकांचं म्हणणं होतं.

शांतीप्रिय राष्ट्राची प्रतिमा

पाकिस्तानने एक शांतताप्रिय देश म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये रचनात्मक, संतुलित आणि सकारात्मक भूमिका बजावली आहे, असे पंजाब विधानसभेत या ठरावादरम्यान नमूद करण्यात आलं. या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी औपचारिक नॉमिनेशन सादर केलं जावं, अशी मागणी या ठरावात एकमताने करण्यात आली.

एकीकडे पाकिस्तान जेव्हा स्वतःच गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटांशी झुंजत आहे, परंतु सत्ताधारी पक्ष त्यांना जागतिक शांतता दूत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळेसच ही घडामोड घडत्ये. जर हे (नोबेलसाठी) नॉमिनेशन नामांकन औपचारिकपणे स्वीकारलं गेलं, तर ते पाकिस्तानसाठी एक महत्त्वपूर्ण राजनैतिक यश ठरू शकतं.

Follow Us
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप