
India Pakistan War : पहलगामवर हल्ला केल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. या मोहिमेनंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. दरम्यान, भारताशी स्पर्धा करताना अनेकदा तोंडावर आपटल्यानंतरदेखील पाकिस्तान आपले कारनामे थांबवताना दिसत नाहीये. आता पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली आहे. या थेट धमकीनंतर आता जगात खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच समा टीव्हीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानचे भारतासोतबचे संबंध यावर भाष्य केले. त्यांनी भारतासोबत युद्ध होऊ शकते, अशा आशयाचे विधान केले. सोबतच औरंगजेबाचा शासनकाळ वगळता भारत कधीच एकसंध नव्हता, असेही मत त्यांनी यावेळी केली.
काही दिवसांपूर्वी भारतीय आर्मीचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला होता. जगाच्या नकाशावर पाकिस्तानला आपले अस्तित्त्व टिकवून ठेवायचे असेल तर त्यांनी दहशतवादाचे समर्थन करणे थांबवावे, असे द्विवेदी म्हणाले होते. त्यानंतर आता आसिफ यांनी मुलाखतीत भारतासोबतच्या युद्धावर भाष्य केले. “भारत हा कधीच एकसंध प्रदेश नव्हता. त्या देशात कधीकाळी 540 संस्थाने होती. आम्ही पाकिस्तानीची निर्मिती करताना एक विशेष दृष्टीकोन समोर ठेवलेला आहे. अल्लाहच्या कृपेने आमच्यात युद्ध होऊ नये. पण हे युद्ध होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर यावेळी पहिल्यापेक्षा जास्त चांगले परिणाम दिसतीलस,” असे आसिफ म्हणाले आहेत.
दरम्यान, याआधीही आसिफ यांनी भारताला धमकी दिलेली आहे. ऑपेरशन सिंदूरनंतर भारतातील जनमत सरकारच्या विरोधात गेले आहे. सरकारने आपली विश्वासार्हता गमवलेली आहे, असे आसिफ म्हणाले होते, असे त्यावेळी आसिफ एक्सच्या माध्यमातून म्हणाले होते. आता पुन्हा एकदा आसिफ यांनी भारतासोबत युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानाकडे भारत कसा पाहतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.