AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खानच्या पत्नीचे हाल, जेलमध्ये उंदरांसोबत राहण्याची वेळ; जेवणात मिर्जी पावडर… UN चा धक्कादायक अहवाल

Bushra Bibi : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांती पत्नी बुशरा बीबी खान यांनी तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांबाबत संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना उंदरांसोबत रहावे लागत असल्याचे समोर आले आहे.

इम्रान खानच्या पत्नीचे हाल, जेलमध्ये उंदरांसोबत राहण्याची वेळ; जेवणात मिर्जी पावडर... UN चा धक्कादायक अहवाल
Bushra BibiImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 24, 2025 | 7:54 PM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांती पत्नी बुशरा बीबी खान हे तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. अशातच आता बुशरा बीबी यांना तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांबाबत संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी याबाबत एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये बुशरा यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बुशरा यांना एका अतिशय लहान, बंद आणि हवा येण्यात जागा नसलेल्या कोठडीत ठेवले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. बुशरा यांनी कोठडी अत्यंत घाणेरडी आणि गरम आहे. या खोलीत उंदीर आणि इतर कीटक फिरत आहेत. तसेच या कोठडीला होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो, त्यामुळे येथे अनेकदा अंधाराचे वातावरण असते.

बुशरा बीबीला पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नाही

संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात म्हटले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबीला पिण्यासाठी स्वच्छ पाणीही दिले जात नाही. तसेच तिच्या जेवणात मोठ्या प्रमाणात मिरची पावडर मिसळली जाते. यामुळे तिच्या आरोग्यावर थेट परिणाम झाला आहे. बुशरा बीबीचे वजन 15 किलोंनी कमी झाले आहे. तसेत तिला अनेक आजारांनी ग्रासले आहे, मात्र तुरुंग प्रशासनाकडून तिच्यावर उपचार करण्यात आलेले नाही. तसेच तिचे दात किडले आहेत अशी माहितीही अहवालात देण्यात आली आहे.

बुशरा यांना वेगले ठेवण्यात आले आहे

या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, बुशरा बीबीला दिवसातून 22 तासांपेक्षा जास्त काळ पूर्णपणे एकांतवासात ठेवण्यात येते. तिला तिच्या वकिलांशी भेटण्याची परवानगी मिळत नाही. तसेच तिला तिच्या कुटुंबाशी किंवा वैयक्तिक डॉक्टरांशी संपर्क करण्याची परवानगी दिली जात नाही. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी अ‍ॅलिस जिल एडवर्ड्स यांनी म्हटले की, बुशरा बीबीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे.

इम्रान आणि बुशरा यांना 17 वर्षांची शिक्षा

पाकिस्तानातील न्यायालयाने तोशाखाना-2 भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना प्रत्येकी 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर दोघांनाही 1.64 कोटी पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बुशरा यांना जानेवारी 2025 मध्ये अटक करण्यात आली आहे, तर इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून तुरुंगवास भोगत आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.