AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पुढील 17 दिवस पाकिस्तानसाठी धोक्याचे?; पाकच्या बड्या नेत्याची भविष्यवाणी काय?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानी नेते नदीम मलिक यांनी पुढील 17 दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे आणि युद्धविराम असूनही तणाव कायम आहे. पाकिस्तानच्या सैन्याने प्रचार करून वास्तव लपवण्याचा प्रयत्न केला आहे, पण भीती मात्र खऱ्या आहे.

मोठी बातमी ! पुढील 17 दिवस पाकिस्तानसाठी धोक्याचे?; पाकच्या बड्या नेत्याची भविष्यवाणी काय?
pakistan leader nadeem malikImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2025 | 1:30 PM
Share

भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं आहे. पाकिस्तानकडून भारताला कडाडून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न पाकिस्तानच्याच अंगलट आला. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैन्याशी संबंधित 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. यात अनेक खतरनाक अतिरेक्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्ताने भारतासोबत शस्त्रसंधी केली. पण अजूनही पाकिस्तानला भारताची भिती वाटत आहे. भारत केव्हाही आपल्यावर हल्ला करू शकतो असं पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानच्या एका बड्या नेत्यानेच ही भीती आणि भविष्यवाणीही केली आहे.

पाकिस्तानचे न्यूज चॅनल समा टीव्हीवरील एका कार्यक्रमात अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक यांनी ही भीती आणि भविष्यवाणी व्यक्त केली आहे. मेचा महिना अत्यंत महत्त्वाचा असेल. खासकरून पुढचे 17 दिवस. कारण युद्धविराम झाल्यानंतरही तणाव कायम आहे. येत्या 17 दिवसात भारत पुन्हा पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो. भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. लढाई अजूनही संपलेली नाही, असं नदीम मलिक यांनी म्हटलं आहे.

सतर्क राहावं लागेल

पाकिस्तानला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तणाव वाढण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या अपप्रचाराचीच री ओढली. पाकिस्तानने भारताच्या पाचहून अधिक विमानांना पाडलं आहे, असं सांगतानाच युद्ध संपलेलं नाही. फक्त युद्धविराम लागू आहे, असं मलिक म्हणाले.

पाकिस्तान अधिकच घाबरला

पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या हल्ल्याची भीती नवीन गोष्ट नाही. पहलगाम येथील हल्ल्यानंतर दोन आठवड्यापर्यंत पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली होता. भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानची ही भीती वास्तवात आणली. भारताने या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. 100 हून अधिक दहशतवादीही ठार केले.

त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केला. त्यानंतर भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइल हल्ले परतवून लावले. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू आहे. पण तरीही पाकिस्तानी नेते आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....