Flash Floods : पुराचा महाकहर,मुसळधार पावसाचा हाहा:कार,340 लोकांवर काळाचा घाला,अनेक जण बेपत्ता

Weather Update : या शेजारच्या देशात मुसळधार पाऊस आणि महापूराने 340 लोकांचा मृत्यू झाला. अनकेजण बेपत्ता आहेत. एक जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. येथे जणू आभाळच फाटलं आहे. सरकार आणि लष्कर मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.

Flash Floods : पुराचा महाकहर,मुसळधार पावसाचा हाहा:कार,340 लोकांवर काळाचा घाला,अनेक जण बेपत्ता
आभाळ फाटले
| Updated on: Aug 17, 2025 | 10:19 AM

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात आभाळ फाटलं आहे. गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसाने अनेक नद्यांना महापूर आला आहे. नद्यांचे पाणी अनेक गावात शिरले आहे. त्याने जिकडे तिकडे हाहाकार उडाला आहे. Geo News च्या वृत्तानुसार, आतापर्यंत 340 लोखांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. हवामानाने येथील लोकांना मोठा फटका दिला आहे. पाकिस्तानच्या हवामान खात्याने 21 ऑगस्टपर्यंत मोठा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) महापूरानेच नाही तर अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक ठिकाणी डोंगर खचल्याचे आणि घरं पडल्याचे सांगितले. त्यामुळे मृत्याचा आकडा वाढला आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेतात तळे साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या भागात अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे. केवळ पाकिस्तानच नाही तर भारत आणि नेपाळमधील अनेक भागात मुसळधार पावसाचा कहर दिसून आला. अनेक भागातील रहिवाशांना त्याचा फटका बसला.

सर्वाधिक फटका बुनर जिल्ह्याला

राजधानी इस्लामाबादजवळील बुनर जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. या जिल्ह्यात 184 जणांचा बळी गेला. महापूरामुळे मोठ मोठे दगड रस्त्यावर येऊन पडले तर झाडं उन्मळून पडली. यामुळे अनेक गावातील घरं गाडल्या गेल्याची भीती व्यक्त होत आहे. नदीने थेट गावात घुसखोरी केली. त्यात अनेक घरं वाहून गेली. गाव आता दलदलीत गाडल्या गेले. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन मदतनीस आणि लष्कर संयुक्तरित्या बचाव आणि मदत कार्य करत आहे. पण अनेक भागात रस्तेच वाहून गेल्याने आणि दरडी कोसळल्याने मदत कार्यात अडचणी येत आहे.

लष्कर धावले मदतीला

या नैसर्गिक संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागात शिबिर आणि तंबू लावण्यात आले आहेत. त्याठिकाणी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करुन देण्यात येत आहे. लष्कराच्या तुकड्या मदतीला धावल्या आहेत. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिण आशियात पावसाने पॅटर्न बदलला आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे.