AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाच्या युद्धनौका भारताच्या संरक्षणासाठी समुद्रात, शेजारी देशांची उडाली झोप, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जगाचे लक्ष असताना भारताने मोठा खेळ खेळला. भारत आणि रशियात मोठा संरक्षण करार झाला. आता या कराराची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, यामुळे भारताच्या शेजारी देशांची झोप उडाली आहे.

रशियाच्या युद्धनौका भारताच्या संरक्षणासाठी समुद्रात, शेजारी देशांची उडाली झोप, थेट..
Russia warship
| Updated on: Apr 21, 2026 | 7:48 AM
Share

भारत आणि रशियात संरक्षण संदर्भात एक ऐतिहासिक करार झाला. या करारानंतर पाकिस्तानची झोप उडाली. हेच नाही तर त्यांनी थेट रशियाबद्दल मोठे विधान केले. भारत आणि रशियाने या कराराची अंलबजावणीही सुरू होती. हा करार चीनसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. भारत आणि रशियातील करारात दोन्ही एकमेकांची जमीन वापरू शकतात. युद्धनाैका आणि विमाने तैनात करण्याची परवानगी मिळते. रशियाच्या युद्धनाैका भारताचे संरक्षण करणार आहेत. यासोबतच 3000 हून अधिक सैनिक एकमेकांचे संरक्षण करू शकतात. हा ‘रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट’ (RELOS) करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा भारत रशियासोबतचे आपले संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. या करारामुळे भारत आणि रशियाचे संबंध अधिक चांगले झाले. भारत रशियातील सैन्यतळांचा वापर करू शकतो, रशिया देखील भारतीय सैन्य तळांचा वापर करू शकतो.

थेट रशिया आणि भारत एकमेकांचे संरक्षण करणार असल्याचे कळाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे.  पाकिस्तानी तज्ज्ञांनी या कराराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञ डॉ. अतिया अली काझमी यांनी रशिया-भारत करारावर नाराजी व्यक्त केली. हेच नाही तर भारताच्या नादी रशियाने लागू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले की, मॉस्कोने चूक केली आहे. अमेरिकेने भारतावर विश्वास ठेवून त्याच्याशी संबंध सुधारले होते. पण आता त्यांनी भारतासोबतची भूमिका बदलली आहे. भारत आता रशियाचीही फसवणूक करेल. पाकिस्तानी तज्ज्ञांच्या मते, या प्रदेशातील उदयोन्मुख शक्ती भारत नाहीये. चीन हा या प्रदेशातील शक्ती आहे. त्यामुळे रशियाने चूक केली आहे.

रशियाच्या युद्धनाैका भारताचे संरक्षण करणार म्हटल्यावर अनेक देशांची झोप उडाली. अतिया यांनी पुढे म्हटले की, भारत कोणत्याही एका देशासाठी विशेष संतुलन बनण्याची कल्पना नाकारतो. भारताला अमेरिकेसोबत गुंतवणूक, चिनी वस्तू आणि रशियन घटक एकचवेळी हवीत आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील करारानंतर पाकिस्तानची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल