Pakistan Petrol-Diesel Price Hike : एका दमात पेट्रोल डिझेल दरात 30 रुपयांची वाढ; जनता जात्यात, सरकार गोत्यात!

भारतीय उपखंडातील आणखी एक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. एका दमात पेट्रोल डिझेल दरात 30 रुपयांची वाढ करण्याचा जागतिक विक्रम पाकिस्तानी सरकारने केला आहे. त्यामुळे जनता आगीत झोकल्या गेली आहे तर सरकार ही गोत्यात आले आहे.

Pakistan Petrol-Diesel Price Hike : एका दमात पेट्रोल डिझेल दरात 30 रुपयांची वाढ; जनता जात्यात, सरकार गोत्यात!
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 10:41 AM

भारतीय उपखंडातील (Indian Continental) आणखी एक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.श्रीलंकेनंतर पाकिस्तान (Pakistan) ही अराजकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. राजकीय मुत्सद्दीपणात हाराकिरी सुरू असताना आर्थिक आघाडीवर ही पाकिस्तानची दमछाक झाली आहे. एका दमात पेट्रोल -डिझेल दरात (Petrol diesel price) 30 रुपयांची वाढ करण्याचा जागतिक विक्रम पाकिस्तानी सरकारने केला आहे. त्यामुळे जनता आगीत झोकल्या गेली आहे तर सरकार ही गोत्यात आले आहे.इंधन दरात प्रति लिटर मागे 30 रुपयांची केलेल्या वाढीने महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. गुरुवारी दरवाढीची घोषणा करण्यात आली. हे दर मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले. त्यामुळे इस्लामाबादमध्ये पेट्रोलचा दर 179.85 पाकिस्तानी रुपये आणि डिझेलचा दर 174.15 रुपये प्रति लीटरवर पोहोचले. तर रॉकेलच्या दरातही वाढ होऊन ते 155.95 रुपये प्रति लीटर झाले आहे.

सरकारला प्रतिलिटर 56 रुपये तोटा

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी दरवाढीची घोषणा केली. पत्रकार परिषदेत मिफ्ताह इस्माईल म्हणाले की, सरकारला इंधनाच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. “नवीन किंमती असूनही, आम्हाला डिझेलवर प्रतिलिटर 56 रुपये तोटा होत आहे. या निर्णयाचा राजकारणावर काय परिणाम होतो, याची शहबाज शरीफ सरकारला कल्पना आहे, असे ते म्हणाले. ‘टीकेला सामोरे जावे लागेल, पण देश आणि त्याचे हितसंबंध आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहेत आणि ते वाचवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले.

आतंरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा

गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान महागाईचा सामना करत आहे. आता या इंधनवाढीमुळे वस्तूंच्या किंमती आणखी भडकणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी या देशात ही उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परदेशी बँकांनीदेखील पाकिस्तानच्या रिफायनरींना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी व्यापारी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर इंधन पुरवठादारांनी देशातील राजकीय परिस्थिती बिघडल्याने आगाऊ रक्कमेची मागणी केली आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी यांच्यामधील कतारमधील चर्चा निष्फळ ठरली आहे. पेट्रोल, डिझेलवरील सबसिडी बंद केल्यावरच मदतनिधी बाबत चर्चा करु, असे आयएमएफने पाकिस्तानला फटकारले आहे.

हे सुद्धा वाचा

इम्रान खान यांनी घेतले तोंडसुख

या इंधन दरवाढीविरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आघाडी उघडली आहे. सत्ता गेल्यावर पहिल्यांदा आयते कोलीत मिळाल्याने त्यांनी सरकारवर तोंडसुख घेतले. रशियाकडून 30 टक्के स्वस्त दराने इंधनाची संधी या सरकारने गमवल्याचा आरोप त्यांनी केला. शरीफ सरकारने आम्ही केलेली तजवीज पुढे सुरु ठेवली नाही. या उलट भारताने आघाडी घेत स्वस्तात इंधन पदरात पाडून घेतले. पाकिस्तानी नागरिकांना आणखी मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.