Yasin Malik : शिक्षा यासिन मलिकला पण जळजळ पाकिस्तानची! माजी ते विद्यमान पंतप्रधानांनी कोर्टाच्या निर्णयावर तोडले अकलेचे तारे

Yasin Malik : शिक्षा यासिन मलिकला पण जळजळ पाकिस्तानची! माजी ते विद्यमान पंतप्रधानांनी कोर्टाच्या निर्णयावर तोडले अकलेचे तारे
शिक्षा यासिन मलिकला पण जळजळ पाकिस्तानची!
Image Credit source: tv9

पाकिस्तानच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा प्रत्येक नेता मलिक याच्या समर्थनार्थ ट्विट करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून जम्मू-काश्मीरमधील कैद्यांशी भारत सरकारकडून गैरवर्तन केले जात आहे, असा आरोप करण्यात आलाय.

दादासाहेब कारंडे

|

May 25, 2022 | 7:27 PM

काश्मीरचा फुटीरतावादी नेता आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासिन मलिकला (Yasin Malik) एनआयए कोर्टाने शिक्षा सुनावण्यापूर्वी पाकिस्तानचे धाबे दणाणल्याचे पहायला मिळाले. यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. NIA ने यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यापूर्वी पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जगभरातील देशांना मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही यासिन मलिकवरून आरोप करत भारतावर टीका केली आहे. काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्याला झालेल्या शिक्षेनंतर पाकिस्तानच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा प्रत्येक नेता मलिक याच्या समर्थनार्थ ट्विट करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून जम्मू-काश्मीरमधील कैद्यांशी भारत सरकारकडून गैरवर्तन केले जात आहे, असा आरोप करण्यात आलाय.

भारतावर पाकिस्तानची टीका

तसेच हे पाहता जगभरातील देशांनी याकडे लक्ष द्यायला हवे, काश्मीरचे नेते यासिन मलिक यांना दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवणे हा भारतातील मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा आणि आवाज बंद करण्याचा निरर्थक प्रयत्न आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

शाहबाज शरीफ यांचं ट्विट

इम्रान खान यांचीही टीका

तसेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही यासिन मलिकच्या समर्थनार्थ ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरचे नेते यासिन मलिक यांच्याविरोधात मोदी सरकारने ज्या पद्धतीने फॅसिस्ट धोरण अवलंबले आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. यात यासिन मलिकला बेकायदेशीर तुरुंगात ठेवण्यापासून खोट्या आरोपात शिक्षा देण्यापर्यंतचा समावेश आहे. भारतव्याप्त काश्मीरमध्ये हिंदुत्ववादी फॅसिस्ट मोदी सरकारच्या दहशतवादावर कारवाई करावी, असे म्हणत इम्रान खान यांची आगपाखड झाली आहे.

इम्रान खान यांचं ट्विट

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें