AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yasin Malik : यासिन मलिकला अखेर जन्मठेप, टेरर फंडिंग प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या टेरर फंडिग प्रकरणात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिग प्रखरणात दोषी आढळलेला JKLF प्रमुख यासिन मलिकला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Yasin Malik : यासिन मलिकला अखेर जन्मठेप, टेरर फंडिंग प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय
| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 6:32 PM
Share

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या टेरर फंडिग (Terror Funding) प्रकरणात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला (Yasin Malik) शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिग प्रखरणात दोषी आढळलेला JKLF प्रमुख यासिन मलिकला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. यासिन मलिकला कलम 120 नुसार 10 वर्षे कारावास आणि कलम 121 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासिनची रवानगी आता तिहार जेलमध्ये होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं (Patiyala House Court) यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

यासीन मलिकला कडक बंदोबस्तात आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मागील सुनावणीवेळी यासीनला कोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यावेळी यासिनने दहशतवाद्यांना पैशांचा पुरवठा केल्याप्रकरणातील सर्व आरोपी स्वीकारले होते. 19 मे रोजी पटियाला हाऊस कोर्टाने विशेष न्यायाधीळ प्रवीण सिंग यांनी मलिकला दोषी ठरवलं होतं. तसंच मलिकच्या आर्थिक स्थितीची माहिती घेऊन त्याला किती दंड आकारला जाऊ शकतो हे ठरवण्याचे निर्देश एनआयएनला दिले होते. त्याचबरोबर कोर्टाने मलिकला त्याच्या मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सांगितलं होतं.

अजून कुणा-कुणावर आरोप निश्चिती?

न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, मसरत आलम, नईम खान, मोहम्मद युसुफ शाह, शाबीर शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, मोहम्मद अकबर खांडे, बशीर अहमद भट, राजा मेहराजुद्दीन कलवाल, जहूर अहमद शाह वताली, फरार अहमद शाह, फरार अहमद शाह यांना अटक केली होती. शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह फुटीरतावादी नेत्यांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

दोषी ठरवल्याबाबत पाकिस्तानकडून निंदा

दुसरीकडे पाकिस्तानने यासिन मलिकला दोषी ठरवल्याबाबत निंदा व्यक्त केली आहे. हुर्रियत आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला 2017 मधील एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय. हुर्रियतचा नेता यासिन मलिकला 2017 मध्ये एनआयएने दाखल केलेल्या एका बनावट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. मलिकला एकतर्फी प्रकरणात मानवाधिकार कायदा आणि आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजनैतिक अधिकार संहितेचं उल्लंघन करत दोषी ठरवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानवरही निराधार आरोप करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आठवड्याभरापूर्वी केला होता.

17 वर्षांचा असताना पहिल्यांदा जेल

यासीन मलिक हा सध्या तिहार जेलमध्ये आहे. तो जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये गेला होता तेव्हा त्याचे वय 17 वर्ष होते. यासीन मलिक याचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरच्या मयसूमामध्ये झाला होता. मयसूमा हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात वर्दळीचा परिसर आहे. यासीन मलिक याने आपल्यावरील आरोप स्व:ता मान्य केले आहेत. तो त्याने केलेल्या गुन्ह्याचे समर्थन करताना म्हणतो की, मी 80 दशकात भारतीय सैन्य दलाने जम्मू-काश्मीरमध्ये केलेला अत्याचार पाहिला होता. त्यामुळेच मी हातात शस्त्र घेतले. या कथित हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी जी संघटना यासीन मलिक याने बनवली होती, त्याला त्याने ताला पार्टी असे नाव दिले होते. ही पार्टी राज्यात कायमच अशांतता पसरवण्याचे काम करत होती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.