AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan plane seized : पाकिस्तानची जगात नाचक्की, जिगरी मित्र देशानेच विमान केलं जप्त

Pakistan plane seized : जिगरी दोस्तीमध्ये आला पैसा. पाकिस्तानवर इतके वाईट दिवस आलेत. दुसऱ्या देशात त्यांची विमान जप्त केली जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानची जगात मोठी नाचक्की झाली आहे.

Pakistan plane seized : पाकिस्तानची जगात नाचक्की, जिगरी मित्र देशानेच विमान केलं जप्त
Pakistan plane seized in Malaysia
| Updated on: May 31, 2023 | 9:54 AM
Share

क्वालालंपूर : सध्या पाकिस्तानची हालत खराब आहे. पाकिस्तानात मोठी आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. महागाईमुळे तिथली जनता होरपळतेय. सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. आधीच कर्ज चुकवता येत नसल्यामुळे पाकिस्तानला अन्य देशांकडून कर्ज मिळण मुश्किल झालय. या कठीण काळात पाकिस्तानला त्यांच्या मित्र देशांकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण त्या आघाडीवर सुद्धा निराशाच आहे.

मित्र देशांनीच पाकिस्तानकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची हालत अधिक खराब झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकतीच एक घटना घडली. त्यामुळे जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.

विमान का जप्त केलं?

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स बोईंग 777 हे विमान जप्त करण्यात आलं. भाडेतत्वाच्या वादातून जप्तीची ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानने हे विमान भाड्यावर घेतलं होतं. पाकिस्तानने कर्जाची परतफेड केली नाही म्हणून मलेशियाने क्वालालंपूर विमानतळावर पाकिस्तानच हे विमान जप्त केलं. एआरवाय न्यूजने हे वृत्त दिलय. कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.

पाकिस्तानसाठी मोठी शरमेची बाब

मलेशिया सुद्धा एका इस्लामिक देश आहे. पाकिस्तानचा जिगरी दोस्त, पाठिराख्यांमध्ये मलेशियाची गणना होता. आता त्यांनीच पाकिस्तान विरोधात अशी कारवाई केली आहे. भाड्यावर घेतलेल्या विमानाचे पैसे चुकवता येत नाहीत, ही पाकिस्तानसाठी मोठी शरमेची बाब आहे. विमान जप्तीची पहिली वेळ नाही

जप्तीची कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी हेच विमान विमानतळ अधिकाऱ्यांनी 2021 मध्ये जप्त केलं होतं. त्यावेळी सुद्धा, पैसे थकवण हेच त्यामागे कारण होतं. राजनैतिक स्तरावरुन सूत्र हलल्यानंतर या विमानाचा ताबा पाकिस्तानी वैमानिकांकडे देण्यात आला होता. 27 जानेवारी 2021 जप्त केलेलं विमान पाकिस्तानात परतलं. 173 प्रवासी आणि क्रू मेंबर्स त्या विमानात होते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.