जग हादरलं! पाकिस्तानचा मोठा हल्ला, थेट क्षेपणास्त्राने मारा, चौक्यांवर ड्रोन हल्ला, 60 तासांनी…

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वाद टोकाला पोहोचला असून आता परत एकदा मोठा हल्ला पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला आहे. साैदी अरेबियाने शांततेचे आवाहन केल्यानंतरही मोठा हल्ला पाकिस्तानने केला आहे.

जग हादरलं! पाकिस्तानचा मोठा हल्ला, थेट क्षेपणास्त्राने मारा, चौक्यांवर ड्रोन हल्ला, 60 तासांनी...
Pakistan attack on Afghanistan
| Updated on: Oct 15, 2025 | 9:31 AM

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळतोय. 60 तासांच्या विश्रांतीनंतर परत एकदा तणाव वाढला. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला उत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या लष्कर चाैक्यावर मोठा हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तानचे तब्बल 58 सैनिक मारले गेले. सात सैनिकांनी आत्मसर्मपण केले असून ते अफगाणिस्तानच्या ओलीस आहेत. साैदी अरेबियाने दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्यामध्येच आता पुन्हा एकदा सीमेवर तणाव बघायला मिळाला असून पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानवर केला. पाकिस्तानच्या हल्ल्याचा थेट उत्तर अफगाणिस्तानने दिले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता 6 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा संघर्ष सुरू झाला. दोन्ही देशांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर पहिला हल्ला हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:47 वाजता पक्तिका-कुर्रम सीमेवर असलेल्या अफगाण लष्कराच्या चौकीवर केला. यानंतर, दुसऱ्या हल्ल्यातही पाकिस्तानी सैन्याने पक्तिका-कुर्रम सीमेवर असलेल्या अफगाण चौकीला टार्गेट केले. यानंतर परत रात्री 11 वाजता पाकिस्तानी सैन्याने पक्तिका कुर्रम सीमेवर असलेल्या तिसऱ्या अफगाण सैन्याच्या चौकीवर हल्ला केला. एका मागून एक हल्ले करताना पाकिस्तान दिसला.

पाकिस्तानी सैन्याने अफगाण सैन्यावर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. पक्तिकामध्ये फिरणाऱ्या अफगाण सैन्याच्या टँकवर ड्रोनने हल्ला केला. अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानच्या हल्ल्ला जोरदार उत्तर दिले. पाकिस्तानने केलेल्या  हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अफगाण सैन्याच्या गाड्या खोस्तमधील गुलाम शाह सीमेकडे आणि कंधार-चमन स्पिन बोल्दाक सीमेकडे जात असल्याचे दिसून आले. हेच नाही तर यादरम्यान पाकिस्तानने राजधाी काबूलमध्ये ड्रोन उडवले.

काबूलमध्ये ड्रोन दिसले, यानंतर लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. साैदी अरेबिया आणि कतारच्या आवाहनानंतर अफगाणिस्तानने रविवारी मध्यरात्री भारतीय वेळेनुसार पहाटे 1 वाजता युद्धबंदीची घोषणा केली होती. सकाळी सात वाजेपर्यंत सुरू असलेल्या युद्धबंदीनंतर पाकिस्तानी सैन्याने अफगाण सैन्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली,त्यानंतर अफगाणिस्तानने देखील जोरदार उत्तर दिले आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये संघर्ष टोकाला पोहोचल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत आहे.