AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत फायदा घेईल… आताच संघर्ष थांबवा, पाकिस्तानला मोठी चिंता, थेट अफगाणिस्तानसोबतच्या..

पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर मोठा तणाव बघायला मिळाला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तान सैन्याला पळो की सळो करून सोडले. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात तब्बल 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. आता पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

भारत फायदा घेईल... आताच संघर्ष थांबवा, पाकिस्तानला मोठी चिंता, थेट अफगाणिस्तानसोबतच्या..
Pakistan Afghanistan war
| Updated on: Oct 13, 2025 | 1:47 PM
Share

शनिवारी रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर भयंकर स्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने केलेल्या घातक हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने जोरदार उत्तर दिले. तब्बल 25 पाकिस्तानी लष्कराच्या चाैक्या अफगाणिस्तानने ताब्यात घेतल्या. या हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला पळता भुई कमी झाल्याचे काही व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे. यासोबतच अफगाणिस्तानने 7 पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडले. अफगाण सैन्याने पाकिस्तानात घुसून सात वेगवेगळ्या भागात जड शस्त्रास्त्रांचा मारा केला. या हल्ल्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानवर मोठा हल्ला चढवला. जगातील मुस्लिम देशांनी चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना तात्काळ युद्ध थांबवण्यास सांगितले.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील तणावानंतर थेट भारताला ओढण्यात आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने कोणत्याही स्थितीमध्ये अफगाणिस्तानसोबतचा संघर्ष थांबवणे आवश्यक आहे. कारण याचा फायदा थेट भारत उठवून शकतो. पाकिस्तानमधील सर्वात मोठे वृत्तपत्र डॉनमधील संपादकीय पानावर याबद्दल लिहिण्यात आलंय.

डॉनमध्ये लिहिण्यात आले की, पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत युद्ध थांबवले पाहिजे. जर हे युद्ध सुरू राहिले तर त्याचा थेट फायदा भारताला होईल. तालिबान आणि भारताचे चांगले संबंध नव्हते. मात्र, मागील काही दिवसांपासून यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत. अफगाणिस्तानचे विदेश मंत्री आमिर खान मुत्तकी भारत दाैऱ्यावर होते. पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत संघर्ष सुरू ठेवला तर ते घातक आहे.

हेच नाही तर पाकिस्तानचे मित्र देश सऊदी अरेबिया आणि इराणनेही हे युद्ध थांबवण्यास सांगितले. अफगाणिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांना पाकिस्तानने उत्तर नक्कीच द्यायला हवे. मात्र, युद्ध लढले नाही पाहिजे. कारण हे युद्ध जास्त काळ चालले आणि जगाला चुकीचा संदेश देखील जाईल, अशी मोठी भीती पाकिस्तानच्या माध्यमांनी वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. त्या घटनेला काही महिने होत नाहीत तोवरच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.