पाकिस्तान भारतापुढे हात पसरणार?, तब्बल 1.5 कोटी रोजगार धोक्यात आल्याने इम्रान खान मजबूर !

शेजारील राष्ट्र म्हणजेच पाकिस्तान आगामी काळात मवाळ भूमिका घेण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून होणारे नुकसान पाहता पाकिस्तान हा निर्णय घेऊ शकतो. (pakistan cotton import india)

पाकिस्तान भारतापुढे हात पसरणार?, तब्बल 1.5 कोटी रोजगार धोक्यात आल्याने इम्रान खान मजबूर !
इम्रान खान
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 12:57 PM

इस्लामाबद : शेजारील राष्ट्र म्हणजेच पाकिस्तान आगामी काळात नरमण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून होणारे नुकसान पाहता पाकिस्तान हा निर्णय घेऊ शकतो. पाकिस्तानला सध्या कापसाची कमतरता भासतेय. पण पाकिस्तानची अर्थव्यवस्था बळकट करण्यामागे कापड उद्योगाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पाकिस्तान आगामी काळात भारताकडून कापसाची आयात सुरु शकतो. तसे पाकिस्तानी  वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ ने म्हटलं आहे. त्यासाठी तसा प्रस्तावही दिला जाऊ शकतो.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संबंध अतिशय ताणलेले आहेत, हे सर्वश्रूत आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर तर पाकिस्तानमध्ये जास्तच नाराजी पसरलेली आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करणे बंद केले. पाकिस्तानने रेल्वेसेवासुद्धा बंद केली. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे सध्या दोन्ही देशांतील व्यापारविषयक व्यवहार ताणलेले आहेत. मात्र, या वर्षात पाकिस्तानला 1.2 कोटी बेल्स कापसाची गरज आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सध्या फक्त 7.7 कोटी बेल्स कापसाचे उत्पादन घेऊ शकणार आहे. उर्वरित 5.5 कोटी ब्लेस कापसाची पाकिस्तानला आयात करावी लागेल. त्यासाठी भारत हा योग्य स्त्रोत असल्याचे पाकिस्तामध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान भारताकडे मदतीसाठी विचारणा करु शकतो.

भारतातून कापूस आयात केल्यास अनेक फायदे

भारत आणि पाकिस्तान हे देश शेजारील राष्ट्र आहेत. त्यामुळे इतर दूरच्या देशांकडून आयात करण्यापेक्षा कापूस आयातीसाठी भारत हा योग्य पर्याय असल्याचे पाकिस्तानला वाटते. सध्या पाकिस्तान हा कापसाची आयात अमेरिका, ब्राझील, उझबेकिस्तान या देशांकडून करतो. या देशांसोबत व्यवहार करणे पाकिस्तानला महाग पडते. तसेच आयात केलेला माल पाकिस्तानमध्ये दाखल होण्यास तब्बल 2 महिने लागतात. हाच माल भारतातून आयात केल्यास त्याला पाकिस्तानमध्ये जायला फक्त तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे भारतातून आयात करणे हे पाकिस्तानसाठी अनेक अंगांनी किफायतशीर आहे.

टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे योगदान

पाकिस्तानमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात पसरलेला असून जवळपास 30 टक्के उद्योग फक्त वस्त्रोद्योगामुळे निर्माण होतो असा अनुमान आहे. कापूसनिर्मितीमध्ये भारत, बांग्लादेश यांनतर पाकिस्तानचा नंबर येतो. पाकिस्तानी जी निर्यात केली जाते त्यातील 60 टक्के निर्यात ही वस्त्रोद्योगाशी निगडीत उत्पादनांची आहे. एकूण निर्मीतीमध्ये वस्त्रोद्योगाचे योगदान 46 टक्के आहे.

दरम्यान, वरील सर्व माहिती लक्षात घेता, भारताशी आयात करार केला नाही तर पाकिस्तानला ते महागात पडू शकते. पाकिस्तानातील तब्बल 1.5 कोटी रोजगार धोक्यात येऊ शकतात. तसेच, पाकिस्तानचे दोना लाख कोटींचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे आगामी दिवसांत पाकिस्तान भारताला कापूस निर्यात करण्याची विनंती करु शकतो.

इतर बातम्या :

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

खुशखबर! आता पेट्रोल-डिझेलसह LPG सिलेंडर स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं ‘कारण’

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.