AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahbaz Sharif : तुम्ही दक्षिण आशियाचे…तुमच्यासारखं..पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून पुन्हा एकदा ट्रम्प यांची चाटूगिरी

Shahbaz Sharif : गाझाच्या पुनर्निर्माणासाठी बोर्ड ऑफ पीसची बैठक झाली. या बैठकीचा वापर शहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना मस्कपॉलिश करण्यासाठी केला. शहबाज शरीफ ट्रम्प यांच्याबद्दल जे बोलले, ती कौतुकापेक्षा चाटूगिरीच जास्त होती.

Shahbaz Sharif : तुम्ही दक्षिण आशियाचे...तुमच्यासारखं..पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून पुन्हा एकदा ट्रम्प यांची चाटूगिरी
shahbaz sharif
| Updated on: Feb 20, 2026 | 9:46 AM
Share

युद्धामध्ये गाझा पट्टी उद्धवस्त झाली आहे. त्याच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने बोर्ड ऑफ पीसची स्थापना झाली आहे. या बोर्ड ऑफ पीसची पहिली बैठक गुरुवारी झाली. वॉशिंग्टन डीसी येथे डोनाल्ड जे ट्रंप इंस्टीट्यूट ऑफ पीस येथे पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ सहभागी झालेले. शहबाज शरीफ यांनी बैठकीत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना मस्का लावण्यात कुठलीही कसर ठेवली नाही.

पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गाझा पट्टीच्या पुनर्निर्माणासाठी झालेल्या या बैठकीचा वापर मस्कापॉलिशसाठी केला. त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दक्षिण आशियाचं सेवियर म्हटलं. म्हणजे वाचवणारे. शरीफ इथपर्यंतच थांबले नाहीत, ते ट्रम्प यांना तुमच्यासारखं कोणी नाही असंही म्हणाले. ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसच्या पहिल्या बैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांती दूत ठरवलं.

शहबाज शरीफ अजून काय म्हणाले?

खऱ्या अर्थाने ट्रम्प हे दक्षिण आशियाचे खरे रक्षक आहेत. दक्षिण आशियाचा ते उद्धार करणार आहेत. शहबाज इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी भारतासोबत युद्ध सुरु असताना ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. युद्ध थांबवण्याचे त्यांचे दावे योग्य ठरवले. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी क्षेत्रात शांततेसाठी काम केल्याचं म्हटलं.

बोर्ड ऑफ पीसमध्ये किती देश?

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या दाव्यांवरुन भारत-पाकिस्तान संघर्ष विरामाच्यावेळी ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पुढाकारने स्थापन झालेल्या बोर्ड ऑफ पीसमध्ये पाकिस्तानसह 27 देश आहेत. अर्जेंटीना, अजरबैजान, सौदी अरेबिया, यूएई आणि इस्रायल हे देश या बोर्डामध्ये आहेत. पॅलेस्टाइन मात्र यामध्ये नाहीय.

भारताची भूमिका काय?

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं. बोर्डाच्या पहिल्या बैठकीत भारत ऑब्जर्वर म्हणून सहभागी झालेला. वाशिंगटन डीसीमध्ये झालेल्या बैठकीत भारताकडून दूतावासाचे ‘चार्ज डी अफेयर्स’ नमग्या खम्पा यांनी प्रतिनिधीत्व केलं.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार