पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, अटक होणार? देशात मोठी खळबळ
पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आता पाकिस्तानमधूनच अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हा चर्चेला विषय ठरला आहे.

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आता पाकिस्तानमधूनच अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हे अटक वॉरंट बलुचिस्तानचं निर्वासित सरकार (बलुचिस्तान गणराज्य) कडून जारी करण्यात आलं आहे. शाहबाज शरीफ यांनी बलुचिस्तानच्या व्हिसा नियमांचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप करत हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. बलुचिस्तानच्या एकतेला धोका निर्माण केल्याचा आरोप देखील पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर करण्यात आला आहे, बलूच नेता मीर यार बलोच यांनी हे शाहबाज शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. मीर यार बलोच हे बलुचिस्तानमधील एक मोठे नेते असून, त्यांनी बलुचिस्तानला स्वातंत्र्य देश म्हणून मान्यता मिळावी यासाठी मोठी चळवळ उभी केली आहे, तसेच ते कायम पाकिस्तानच्या सरकारविरोधात टीका करत असतात.
मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर आरोप केला आहे. शरीफ यांनी बलुचिस्तान गणराज्यच्या व्हिसाचं उल्लंघन केलं असं त्यांनी म्हटलं आहे, तसेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांविरोधात अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलं आहे. आपल्या पोस्टमध्ये बलूच यांनी म्हटलं आहे की, बलुचिस्तानच्या एकतेला धोका पोहोचवणे तसेच व्हिसाचे उल्लंघन करणे या आरोपाखाली पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अटक होऊ शकते. हे अटक वॉरंट सध्या चर्चेला विषय ठरलं आहे.
बलुचिस्तानचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख
पुढे बोलताना मीर यार बलूच यांनी असं देखील म्हटलं की, बलुचिस्तान गणराज्य शेजारी देश असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधांविरोधात व्हिसाचं उल्लंघन आणि परवानगी नसताना अवैध मार्गानं बलुचिस्तानमध्ये प्रवेश केला म्हणून अटक वॉरंट जारी करत आहे. हा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. हे आमच्या हवाई क्षेत्रावर झालेलं आक्रमण आहे. आम्ही पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध करतो आणि त्यांच्या पंतप्रधानांविरोधात अटक वॉरंट जारी करतो. दरम्यान यावर अद्याप पाकिस्तानमधून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये.
