AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगाल पाकिस्तानला अणू तंत्रज्ञान तस्कर अन् भंगारवाल्यांनी मिळवून दिले, ज्येष्ठ शास्त्रांची कबुली

pakistan atomic bomb test: पाकिस्तानला अणूबॉम्ब बनवण्यासाठी चीनने मदत केल्याचे संपूर्ण जगाला माहीत आहे. परंतु पाकिस्तानमध्ये अणू तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी तस्कर आणि भंगारवाल्यांनी मदत केल्याचा कबुलीनामा ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिला.

कंगाल पाकिस्तानला अणू तंत्रज्ञान तस्कर अन् भंगारवाल्यांनी मिळवून दिले, ज्येष्ठ शास्त्रांची कबुली
पाकिस्तानने चोरून अणूतंत्रज्ञान मिळवले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 02, 2024 | 1:57 PM
Share

काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यांमध्ये चांगलेच गाजले. पाकिस्तानकडे अणूबॉम्ब आहे, असे भीती घालण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्याने केला. कंगाल असलेल्या पाकिस्तानला आपल्याकडे नेहमी अणूबॉम्ब हवा होता. परंतु अणूबॉम्ब बनवण्यासारखे तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञ त्यांच्याकडे नव्हते. पाकिस्तानला अणूबॉम्ब बनवण्यासाठी चीनने मदत केल्याचे संपूर्ण जगाला माहीत आहे. परंतु पाकिस्तानमध्ये अणू तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी तस्कर आणि भंगारवाल्यांनी मदत केल्याचा कबुलीनामा ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिला.

पाकिस्तानी एजंट तंत्रज्ञान मिळवत होते अन्…

पाकिस्तानी पत्रकार आणि विश्लेषक रिजवान उर रहमान राजी यांनी आपल्या “राजीनामा” कार्यक्रमात धक्कादायक स्पष्टीकरण दिले. राजी यांनी सांगितले की, ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कदीर खुद यांना मला सांगितले होते की, पाकिस्तानमधील अणूबॉम्बचे श्रेय शास्त्रज्ञांना नाही तर तस्करांना दिले पाहिजे. अणू तंत्रज्ञानसंदर्भात कोण काय बनवत आहे, कोणत्या देशात काय तयार होत आहे, ही माहिती आम्ही पाकिस्तानी एजंटांना देत होतो. पाकिस्तानी एजंट ते मिळवत होते. परंतु त्यापुढेच सर्वात मोठी समस्या होती.

विदेशातून चोरट्या मार्गाने मिळालेले अणूबॉम्बचे तंत्रज्ञान आणि सामग्री पाकिस्तानात आणयची कशी? हा मोठा प्रश्न होता. मग या कामासाठी सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्करांची मदत झाली. त्यांनी आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान पाकिस्तानात पोहचवले. अर्थात गरजेनुसार भंगारवाल्यांची त्यासाठी मदत घेतली गेली.

अमेरिकेचा पैसा वापरुन मिळवले तंत्रज्ञान

रिजवान राजी यांनी आणखी एक कबुली आपल्या कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानने अमेरिकेला धोका देऊन त्यांचा पैसा अणू तंत्रज्ञान मिळवण्यासाठी वापरला. अमेरिका अफगाणिस्तामध्ये असलेल्या राशियाशी लढण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत पाकिस्तानला देत होता. त्या पैशांची हेराफेरी करुन तो अणू तंत्रज्ञान मिळवण्यासाठी वापरला. पाकिस्तानचे माजी सैन्यप्रमुख जिया उल हक यांचा उल्लेख करत राजी यांनी म्हटले की, पाकिस्तानने पाच अब्ज डॉलरसाठी अमेरिकेसाठी अफगाणिस्तानशी युद्ध केले. त्यावेळी मुजाहिदीनांना देण्यासाठी शस्त्र येत होते, ती पाकिस्तान चोरत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा