AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan train hijack: पाकिस्तान ट्रेन हायजॅक 104 ओलिसांची सुटका, बलूचे 16 दहशतवादी ठार

Pakistan Train Hijack Updates: बलूचिस्तान लिबरेशन आर्मी सर्वात मोठा फुटीरवादी समूह आहे. त्यांची स्वतंत्र बलूचिस्तानची मागणी आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारविरोधात त्यांनी विद्रोह सुरु केला आहे.

Pakistan train hijack: पाकिस्तान ट्रेन हायजॅक 104 ओलिसांची सुटका, बलूचे 16 दहशतवादी ठार
Pakistan train hijackImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Mar 12, 2025 | 7:15 AM
Share

Pakistan Train Hijack Updates: पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केल्याच्या घटनेला आता 18 तास झाले आहेत. त्यानंतर अजूनही पूर्ण ओलिसांची सुटका झालेली नाही. पाकिस्तानमधील बलूचिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) मंगळवारी जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती. या ट्रेनमध्ये 450 पेक्षा जास्त प्रवाशी होते. त्यात पाकिस्तान लष्कराचे जवान, अर्धसैनिक दलाचे जवान, आयएसआयचे कर्मचारी, पोलीस व सामान्य प्रवाशी होते. त्यातील सामान्य प्रवाशी आणि माहिला-मुलांना बलूच आर्मीने सोडून दिले. परंतु लष्कारातील जवान आणि आयएसआय कर्मचाऱ्यांसह एकूण 214 जणांना ओलीस ठेवले. बीएलएने पाकिस्तानच्या 30 पेक्षा जास्त सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पाकिस्तान लष्कराने 16 दहशतवाद्यांना ठार करुन 104 जणांची सुटका केल्याचे म्हटले आहे.

सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. सर्व बलुच राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच बलुचिस्तानमध्ये कोणत्याही पाकिस्तानी एजन्सीचा किंवा सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा ही बलुचांची सर्वात मोठी मागणी आहे. चीनसोबत सीपीईसी प्रकल्प सुरू आहे, तो बंद करण्याची मागणी बलूच आर्मीची आहे. दरम्यान, या घटनेत पाकिस्तानी लष्कार किंवा पोलिसांकडून काहीच वृत्त आले नाही.

बलूच आर्मीने घेतली जबाबदारी

बलूच प्रवक्त्याने या ट्रेन अपहरणाची संपूर्ण जबादारी घेतली आहे. त्यांनी सांगितले की, बलूच लिबरेशन आर्मीने मशकाफ, धादर, बोलन, येथे नियोजित ऑपरेशन केले आहे. जिथे आमच्या सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवला. त्यामुळे जाफर एक्स्प्रेस थांबवावी लागली. त्यानंतर आमच्या सैनिकांनी तात्काळ ट्रेन ताब्यात घेतली आणि सर्व प्रवाशांना ओलीस ठेवले.

बलूचिस्तान लिबरेशन आर्मी सर्वात मोठा फुटीरवादी समूह आहे. त्यांची स्वतंत्र बलूचिस्तानची मागणी आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारविरोधात त्यांनी विद्रोह सुरु केला आहे. बलूचला पाकिस्तानसह अमेरिका, ब्रिटनसारख देश दहशतवादी संघटना म्हणतात. बलूच आर्मी बलूचिस्तानमधील पाकिस्तानचे सुरक्षा दल, सरकारी इमारती, चीन लष्करावर हल्ले करत असते.

हे ही वाचा…

बलूच आर्मीसमोर पाकिस्तानी लष्कर सरेंडर, वाचा फक्त 6000 सैनिक असलेल्या या संघटनेची पूर्ण कुंडली

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.