ISI अन् पाक सैन्याची पोलखोल करण्यासाठी पाकिस्तानचा मोठा नेता अमेरिकेत दाखल, आसिम मुनीर यांना म्हटले, मनोरुग्ण
पाकिस्तानी सैन्याने कधीही कोणतेही युद्ध जिंकले नाही. परंतु प्रत्येक निवडणुकीवर प्रभाव पाडला आहे. लष्कराकडून न्यायपालिकेवर सुद्धा दबाब आणला गेला आहे. इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपही सलमान अहमद यांनी केला.

Salman Ahmad on Asim Munir: पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल आसिम मुनीर अमेरिकेत दाखल होत आहे. त्यांच्या या दौऱ्यास माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध संगीतकार डॉ.सलमान अहमद यांनी विरोध केला आहे. त्यांच्या विरोधात निर्देशने करण्यासाठी अहमद सुद्धा अमेरिकेत पोहचले आहेत. व्हाइट हाऊस बाहेरच ते निर्देशने करुन पाकिस्तानी लष्कराची पोलखोल करणार आहेत.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या दौऱ्यास माजी इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलमान अहमद यांनी विरोध केला आहे. त्यांनी वॉशिंगटन डीसीमध्ये सीएनएन-न्यूज 18 ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत मुनीर यांना “मानसिक रोगी” आणि “युद्ध अपराधी” म्हटले आहे. जनरल आसिम मुनीर १२ जून रोजी अमेरिकेत पोहचत आहेत. १४ जून रोजी अमेरिकन सैन्याचा २५० व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. त्यांच्या या दौऱ्यास पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाकडून विरोध केला जात आहे. पीटीआयकडून व्हाइट हाउसबाहेर विरोध प्रदर्शनाची योजना तयार केली आहे.
सलमान अहमद यांनी म्हटले की, जनरल आसिम मुनीर यांच्या यात्रेच्या विरोधात व्हाइट हाउस बाहेर निर्दशने करण्यात येणार आहे. पाकिस्तानमधील आणि विदेशात राहणाऱ्या लोकांना आयएसआय आणि जनरल मुनीर यांच्याकडून धमकवण्यात येत आहे.
ISI अन् मुनीरकडून मानवी हक्कांचे उल्लंघन
सलमान अहमद यांनी पाकिस्तानी सैन्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानी सैन्याने कधीही कोणतेही युद्ध जिंकले नाही. परंतु प्रत्येक निवडणुकीवर प्रभाव पाडला आहे. लष्कराकडून न्यायपालिकेवर सुद्धा दबाब आणला गेला आहे. इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला. सलमान अहमद यांनी दावा केला की, आयएसआय आणि जनरल आसिम मुनीर यांनी हजारो कार्यकर्ते आणि पत्रकारांची हत्या घडवून आणली. पाकिस्तानी जनतेच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्यात आला.
मुनीर घेणार अमेरिकन नेत्यांच्या भेटी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल मुनीर अमेरिकेत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यात तुलसी गब्बार्ड आणि मार्को रुबियो यांचाही समावेश आहे. त्यावर सलमान अहमद यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, अमेरिका एक असा व्यक्तीचे स्वागत करणार आहे, ज्याने आपल्या देशातील लोकशाही संपवली आहे. त्यांनी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवल्यानंतर अफगाणिस्तानवरसुद्धा हल्ला केला आहे. त्यात अनेक मुले आणि महिलांचाही मृत्यू झाला आहे.
