AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistani woman : पाकिस्तानातील तरुणी नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी भारतात, वाचा भारतात आल्यानंतर काय म्हणाली

मी भारतात आल्यापासून मला खूप छान वाटतं आहे. मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय. तसेच मी अनोळखी लोकांसोबत आहे असं मला वाटतं नाही. विशेष म्हणजे माझ्यासाठी इथे कोणी नवीन नाही, सगळेचं जुने आहेत. असं पाकिस्तानातून आलेली तरूणी शुमाइला हीने सांगितले.

Pakistani woman : पाकिस्तानातील तरुणी नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी भारतात, वाचा भारतात आल्यानंतर काय म्हणाली
किस्तानातील तरुणी नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी भारतातImage Credit source: twitter
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Edited By: महेश घोलप | Updated on: Aug 23, 2022 | 9:04 AM
Share

नवी दिल्ली – लग्नाच्या कथा आत्तापर्यंत आपण अनेक ऐकल्या आहेत. तसेच परदेशातील व्यक्तीशी लग्न अशा पद्धतीच्या देखील तुम्ही कथा तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. आज सुध्दा एक अशीचं घटना तुम्हाला इथं वाचायला मिळणार आहे. पाकिस्तानमधील (Pakistan) एक तरुणी लग्न करण्यासाठी भारतात (India) परतली आहे. तिने लाहोर येथील चेक पोस्ट प्रवेश द्वारातून भारतात प्रवेश मिळविला आहे. त्यावेळी तिथं तरूणाची घरातील सगळे कुटुंबिय उपस्थित होते. त्यांनी तरुणीचं स्वागत देखील केलं आहे. कमल कल्याण (Kamal Kalyan) असं तरूणाचं नाव आहे, तर शुमाइला (Shumaila) असं तरुणीचं नावं आहे. दोघांनी कोरोनाच्या आगोदर ऑनलाईन पद्धतीने लग्न केलं असल्याची माहिती टाईम्सने दिली आहे. 2020 लग्न करणार होते. परंतु कोरोनाचा संसर्ग देशात अधिक असल्याने त्यांचं लग्न झालं नाही.

Pakistani woman

मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय

मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय

मी भारतात आल्यापासून मला खूप छान वाटतं आहे. मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय. तसेच मी अनोळखी लोकांसोबत आहे असं मला वाटतं नाही. विशेष म्हणजे माझ्यासाठी इथे कोणी नवीन नाही, सगळेचं जुने आहेत. असं पाकिस्तानातून आलेली तरूणी शुमाइला हीने सांगितले. ती आमची सून नव्हे मुलगी आहे असं तरुणाच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.

मी भारतात आल्याने घरचे खूष आहेत

तरुणीचे लग्न हे तिच्या कुटुंबियांनी ठरविले आहे. त्याचबरोबर माझ्या घरच्यांनी जे मला सांगितले तसे मी केले आहे. पाकिस्तानात असताना अनेकदा माझ कल्याण कमल यांच्याशी बोलणं होतं होतं. तसेच काहीवेळेला आम्ही दोघांनी व्हिडीओच्या माध्यमातून देखील बोलणं केलं आहे. ज्यावेळी तरुणी भारतात येणार होती. त्यावेळी तिचे सगळे मित्र मैत्रीणी आणि कुटुंबिय लाहोरच्या गेटपर्यंत सोडायला आले होते. मी माझ्या घरच्यांना कायम संपर्कात आहेत. तसेच मी जो काही निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या घरातील सदस्य अत्यंत खूष आहेत. शुमाईला भारतात येण्यासाठी दोनदा व्हिसासाठी अर्ज करावा लागला. कारण सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर मला भारतात येण्याची परवानगी मिळाली आहे.

दोन्ही देशातील सरकारने ही पद्धत थोडीसी सोपी करावी अशी विनंती सुध्दा शुमाईला या तरुणीने केली.

Follow Us
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा