पाकिस्तानी सैन्याचा आणखी एक खोटारडेपणा उघड, म्हणे, तो अतिरेकी नाही, मौलवी होता; एका आयडीमुळे…
पाकिस्तानाने दहशतवाद्याच्या दफनविधीतील एक व्यक्ती मौलवी असल्याचं सांगितलं होतं. पण त्या व्यक्तीचे आयडी कार्ड हाफिज अब्दुल रऊफशी जुळले असल्याने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. रऊफ हा अमेरिकेने घोषित केलेला वैश्विक दहशतवादी आहे आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे.

पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा उघड झाला आहे. दहशतवाद्यांची ओळख लपवताना पाकिस्तानची दमछाक होत आहे. पण पाकिस्तानी सैन्याने कितीही कांगावा केला तरी त्यांचा खोटारडेपणा समोर येतच आहे. भारताच्या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवादी मारले गेले. त्याच्या दफनविधीला पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी उपस्थित होते. तसेच दहशतवादी हाफिज अब्दुल रऊफही उपस्थित होता. भारताने हा फोटो जगासमोर आणला आणि पाकिस्तानच दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसत असल्याचं जगासमोर आणलं. पाकिस्तानी सैन्याने मात्र हा दहशतवादी नसून मौलवी असल्याचं सांगितलं. पण एका आयडीमुळे पाकिस्तानी सैन्याचा बुरखा टराटरा फाटला गेला असून सत्य जगासमोर आलं आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन भारताचे सर्व दावे फेटाळून लावले होते. पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन जगासमोर वेगळीच स्क्रिप्ट मांडली. व्हायरल फोटोतील तरुण अतिरेकी नाही, तर एका सामान्य कुटुंबातील धर्मगुरू आहे. हा तरुण काही पाकिस्तानी सैन्यांसोबत एका दफनविधीला उपस्थित होता, असं पाकिस्तानी सैन्याने सांगितलं. तसेच त्या व्यक्तीचं आयडी कार्डही पाकिस्तानी सैन्याने दाखवलं. तसेच हा तरुण सामान्य राजकीय कार्यकर्ता असल्याचा दावाही पाकिस्तानी सैन्याने केला होता.
आयडीमुळे ओळख पटली
पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यानंतर चौकशीतून मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी सैन्य ज्या व्यक्तीला मौलवी म्हणून जगासमोर आणत होती, त्या व्यक्तीची जन्म तारीख, राष्ट्रीय आयडी नंबरसमोर आला आहे. या मौलवीचा आयडी नंबर आणि जन्म तारखी अमेरिकेने वैश्विक दहशतवादी घोषित केलेल्या हाफिज अब्दुर रऊफशी जुळत आहे. त्यामुळे पाकिस्तान ज्या व्यक्तीला मौलवी म्हणून सांगत आहे, ती व्यक्ती अतिरेकी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
In his press briefing, Pakistan’s DG ISPR claimed that the viral image of the LeT terrorist at a funeral with other army men is actually an innocent family man and a preacher.
He shared his National ID card to ‘prove’ how he is a simple party worker (see 4:30), however the… pic.twitter.com/dCXgWwmhOx
— Journalist V (@OnTheNewsBeat) May 11, 2025
आतंरराष्ट्रीय दहशतवादी
अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटच्या मते, हाफिज अब्दुर रऊफ लष्कर ए तोयबा आणि त्याच्या फ्रंट संघटनांसाठी निधी जमा करण्याचं काम करतो. पाकिस्तानी सैन्याने जे आयडी दाखवलं त्यावर वेल्फेअर विंग इंचार्ज, पीएमएमएल (PMML) लिहिलं आहे. म्हणजे आपल्या दहशतवादी कारवाया लपवण्यासाठी तो राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनेच्या नावाचा वापर करत आहे. पाकिस्तानी सैन्याने त्या व्यक्तीला धर्मप्रचारक म्हणून सांगितलं. वास्तवात तो एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. यावरून पाकिस्तान जाणूनबुझून दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं कामही करत आहे.
रिपोर्टनुसार, रऊफ 1999 पासून LeTचा सीनिअर कमांडर आहे. हाफिज सईदच्या नेतृत्वात तो काम करतो. लष्कर ए तोयबाशी संबधित फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनद्वारे दहशतवादी कारवायांसाठी निधी सम करणे आणि 2008च्या मुंबईवरील हल्ल्यातही त्याचा समावेश आहे.
