बायडन मंत्रिमंडळ इतिहास घडवणार, पहिल्यांदाच LGBTQ नेत्याला मंत्रिपद

38 वर्षीय पीट बटइग हे स्टेट प्रायमरी किंवा कॉकसची निवडणूक जिंकणाऱ्या सर्वात युवा नेत्यांपैकी एक होते

बायडन मंत्रिमंडळ इतिहास घडवणार, पहिल्यांदाच LGBTQ नेत्याला मंत्रिपद
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 2:31 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी परिवहन मंत्रालयासाठी माजी मेयर पीट बटइग (Pete Buttigieg) यांचे नाव सुचवले आहे. समलिंगी असल्याचं सार्वजनिकरित्या स्वीकारत राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दावा करणारे बटइग हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच नेते ठरले आहेत. त्यांचे नामांकन डेमोक्रॅटिक पक्षाने मान्य केल्यास ते सिनेटचे पहिले एलजीबीटीक्यू (LGBTQ) कॅबिनेट सदस्य असतील. (Pete Buttigieg will be the first lgbtq secretary of us president cabinet)

साऊथ बँडच्या विकासाचा शिल्पकार

38 वर्षीय पीट बटइग हे स्टेट प्रायमरी किंवा कॉकसची निवडणूक जिंकणाऱ्या सर्वात युवा नेत्यांपैकी एक होते. 29 व्या वर्षी ते पहिल्यांदा निवडणुकीत विजयी झाले होते. इंडियानातील होमटाऊन साऊथ बँडमधील विकासकार्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणत साऊथ बँडला इनोव्हेशन आणि नोकऱ्यांचं हब बनवलं. साऊथ बँड हा कोणे एके काळी अमेरिकेतील सर्वात निर्मनुष्य भाग मानला जात असे.

बायडनकडून पीट यांचं गुणगान

“पीट बटइग हे देशभक्त आणि समजूतदार व्यक्ती आहेत. परिवहन मंत्रालय आव्हानं आणि संधीने पुरेपूर व्यापलेलं आहे. त्यामुळे पीट यांना मी परिवहन मंत्रिपदी नियुक्त करतो” अशी घोषणा बायडन यांनी मंगळवारी केली. त्यानंतर युवावर्गासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे, पर्यावरणसंबंधी आव्हानं पेलणे आणि सर्वांना समान वागणूक देण्याची ग्वाही पीट यांनी जनतेला दिली.

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडन यांच्या अध्यक्षपदावर इलेक्ट्रोलच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा कॅपिटल हिलसमोर होणार आहे.

अमेरिकेत अध्यक्षांच्या शपथविधीचा सोहळा 20 जानेवारीला संपन्न होतो. या दिवसाला अध्यक्षांच्या कार्यकालाचा पहिला दिवस मानला जाते. अमेरिकेत ही परंपरा 1937 पासून सुरु आहे. यावर्षाीच्या शपथविधी सोहळ्यावर कोरोना संसर्गामुळे मर्यादा येणार आहेत.

संबंधित बातम्या:

अमेरिकेत अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरमध्ये, शपथविधी 20 जानेवारीला, काय परंपरा?

बायडन आता फक्त एक पाऊल दूर !.

(Pete Buttigieg will be the first lgbtq secretary of us president cabinet)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.