
Philippines Boat Accident : समुद्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. समुद्राच्या विस्तीर्ण पाण्यात अनेक महागाय गोष्ट सामावू शकतात. मानवाने कितीजरी प्रगती केलेली असली तरी समुद्रातील जलशक्तीपुढे मानवाचे काहीही चालत नाही. आजकाल सागरी वाहतुकीत मोठी प्रगती झालेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक मोठी जहाजं आज हजारो प्रवासी सोबत घेऊन प्रवास करतात. परंतु आता अशाच एका धक्कादायक फेरी जहाजासोबत भयानक अपघता घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 350 पेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणारी बोट चक्क समुद्रात बुडाली आहे. ही घटना फिलिपिन्समधील दक्षिणेत असलेल्या एका बेटाजवळ घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार फिलिपिन्सजवळ असलेल्या एका बोटाजवळ या जहाजाचा अपघात जाला आहे. या जहाजात एकूण 350 पेक्षा जास्त प्रवासी होते. यातील 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोद घेतला जात आहे. बचाव पथकाने आतापर्यंत 301 जणांचे प्राण वाचवले असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या व-त्तानुसार अपघात झालेली बोट ही इंटर आयलँड कार्गो आणि पॅसेंजर फेरी होती. ही बोट जाम्बोआंगाहून सुलू प्रांतातील जोलो द्विपावर जाणार होती.
या जहाजात एकूण 332 प्रवासी होते. तसेच 27 क्रू मेंबर्स होते. भर रात्री या जहाजात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर हे जहाज हळूहळू बुडू लागले. कोस्टल गार्डने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज प्रवासासाठी निघाल्यानंतर साधारण 4 तासांनी रविवार आणि सोमवारदरम्यानच्या रात्री एक वाजून 50 मिनिटांनी या जहाजाने संकटात असल्याचे सिग्नल दिले. त्यानंतर लगेच बचाव पथकं पाठवण्यात आली.
At least 15 bodies were recovered, and 43 people remained missing after an inter-island ferry carrying at least 350 people sank early Monday morning in waters off Basilan province in the southern Philippines: Foreign Media #lka #Philippines #Basilan #Boat pic.twitter.com/EkyTRKWxpR
— Thimira Nawod (@ImThimira07) January 26, 2026
दरम्यान ही फेरी नेमकी का बुडाली याचे नेमके अद्याप कारण समजू शकलेले नाही. या अपघाताची आता चौकशी केली जाणार आहे. या बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक प्रवास करत होती का? याचाही शोध घेतला जाणार आहे.