AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही कफन खरेदी केलं होतं, पण नवं आयुष्य मिळालं…इराणहून मायदेशी परतलेल्यांनी कथन केला थरारक अनुभव

इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतातर्फे ऑपरेशन सिंधू चालवले जात आहे. अनेक भारतीयांना परत आणण्यात आले आहे. याच दरम्यान, उत्तर प्रदेशातील बरेली येथील काही यात्रेकरू जे इराणला गेले होते ते परतले. तिथे भीतीच्या सावटाखाली कसे जगत होते, हे अनुभव कथ करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

आम्ही कफन खरेदी केलं होतं, पण नवं आयुष्य मिळालं...इराणहून मायदेशी परतलेल्यांनी कथन केला थरारक अनुभव
इराणहून मायदेशी परतलेल्यांनी कथन केली आपबिती Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 25, 2025 | 10:05 AM
Share

इराणहून भारतात सुखरूप परतलेले उत्तर प्रदेशातील बरेली येथील यात्रेकरू आज आपल्या मातृभूमीच्या मातीचे चुंबन घेऊन देवाचे आभार मानत आहेत. परत येताना त्यांच्या डोळ्यात भीती होती. पण इथे आल्यावर आता ते आपल्याच लोकांमध्ये पुन्हा आले आहेत, याचे समाधान ता त्यांच्या डोळयात दिसतं. इराणमध्ये घालवलेले ते चार दिवस त्यांच्यासाठी एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. डोक्यावर उडणारी मिसाइल्स, धमाका-स्फोटांचे आवाज आणि बंद झालेली एअरपोर्ट्स. पुढचा निशाणा आपण बनून आपलाच जीव जाणार नाही ना याची भीती त्यांना सतत सतावत होती.

तीर्थयात्रेनंतर परतलेल्या बरेलीच्या कांगी टोला येथील नजमा बेगम म्हणतात की, चार दिवस असे गेले, तेव्हा असं वाटलं की मायदेशात परतणे शक्य नाही. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून आकाशात अनेक मिसाइल्स उडताना दिसत होती. क्षणभर माझे हृदय धडधडलं. मग मला वाटलं की जर इथेही मृत्यू आला तर मी ते शहीद म्हणून स्वीकारेन. आम्ही तर कफनही खरेदी केलं होतं. इराणमधील वातावरण खूप भावनिक होते. लोक एकमेकांना धीर तर देत होते, पण आतून तर सगळेच घाबरले होते.

विमान रद्द झाल्याचं ऐकलं आणि हादरलोच..

मायदेशी परत आलेल्यांमध्ये ठाणे बारादरी परिसरातील मीरा की पैठ येथील रुखसर नक्वीही होती. ‘जेव्हा विमान रद्द झाल्याची बातमी कळली तेव्हा मी माझं हृदय थरथर कापू लागलं. जणू काही सगळ्या आशाच संपल्या. मला रात्री झोपही येत नव्हती. माझी एकच प्रार्थना होती, कसंतरी करून मला मायदेशी परतता येऊ दे. भारतीय दूतावासाने आम्हाला मदत केली आणि आम्हाला कोमहून मशदला नेण्यात आले. आम्हाला मशदमधील एका चांगल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. पण आमची मातृभूमी पाहण्यासाठी आमचे मन अस्वस्थ होते.’ असा अनुभव तिने कथन केला.

मिसाइल्सचे व्हिडीओही बनवले

बरेलीच्या प्रेमनगर परिसरातील किला कॅन्टोन्मेंट येथील हसन जाफर यांनी आपल्या हृदयद्रावक कहाणीचे वर्णन केलं. तेथील लोकांना आकाशात उडणाऱ्या मिसाइल्सचे व्हिडिओ बनवण्याची इतकी सवय झाली होती. पण आम्ही भारतीय यात्रेकरू घाबरलो होतो. स्फोटांचे आवाज अगदी हादरवणारे होते. मशद विमानतळावरही मोबाईल फोन बंद होते. मायदेशी सुखरूप पोहोचता यावे एवढीच सगळेजण मनापासून प्रार्थना करत होते, असं त्यांनी सांगितलं.

दिल्ली एअरपोर्टवर तिरंगा देऊन स्वागत

किला येथील मुजीब जेहरा यांनी सांगितलं की, यात्रेकरूंना फारशी अडचण आली नाही, पण सर्वांच्या मनात भीती होती. भारतीय दूतावासाचे मिसम रझा आणि इराणमधील मौलाना हैदर साहब यांनी खूप मदत केली. जेव्हा आम्ही दिल्ली विमानतळावर पोहोचलो तेव्हा लोकांनी आम्हाला तिरंगा दिला तेव्हा आमचे डोळे भरून आले. असं वाटलं जणू आपल्याला पुन्हा आयुष्य मिळालं. भारत सरकार आणि इराण सरकारचे आभार मानते.

मायदेशी येऊन मिळालं समाधान

इराणला गेलेले बरेलीचे हे यात्रेकरू, आता आयुष्यभर लक्षात राहतील अशी कहाणी घेऊन परतले आहेत. मृत्यू त्यांच्या डोक्यावर येऊन ठेपला होता, मात्र तरीही त्यांनी हिंमत गमावली नाही. इराणमध्ये राहणे खूप कठीण होते, मात्र त्यापे7ाही कठीण होतं ते आपल्या मायदेशापासून दूर राहणं. आता सगळेजण सुखरुपरित्या मायदेशी परतलेत तर समाधाना मिळालं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.