AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi At UNGA : ‘जेव्हा भारताचा विकास होतो, तेव्हा जगाचा विकास होतो’, संयुक्त राष्ट्रातील मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे

जलवायू परिवर्तन, दहशतवाद, आदी मुद्द्यांकडे पंतप्रधान मोदींनी जगाचं लक्ष वेधलं. दहशतवाचा धोका एकट्या भारताला नाही तर संपूर्ण देशाला असल्याचं मोदी यांनी आवर्जुन सांगितलं. जेव्हा भारताची प्रगती होते, तेव्हा जगाच्या प्रगतीतही हातभार लागतो, असं मोदी यांनी आवर्जुन सांगितलं.

PM Modi At UNGA : 'जेव्हा भारताचा विकास होतो, तेव्हा जगाचा विकास होतो', संयुक्त राष्ट्रातील मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 7:34 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी भारताचं जगाप्रति असलेलं दायित्व मांडलं. तसंच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतानं केलेलं कार्य आणि लसनिर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं भाष्य केलं. तसंच जगातील लस निर्मिती कंपन्यांनी भारतात यावं असंही मोदी यावेळी म्हणाले. त्याचबरोबर जलवायू परिवर्तन, दहशतवाद, आदी मुद्द्यांकडे पंतप्रधान मोदींनी जगाचं लक्ष वेधलं. दहशतवाचा धोका एकट्या भारताला नाही तर संपूर्ण जगाला असल्याचं मोदी यांनी आवर्जुन सांगितलं. जेव्हा भारताची प्रगती होते, तेव्हा जगाच्या प्रगतीतही हातभार लागतो, असं मोदी यांनी आवर्जुन सांगितलं. (PM Narendra Modi’s speech at the UN General Assembly)

पंतप्रधान मोदींच्या UNGA मधल्या भाषणातील प्रमुख मुद्दे

‘मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग, 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना करत आहे. अशा भयंकर महामारीमध्ये प्राण गमावलेल्या लोकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसंच त्यांच्या परिवारासमोर संवेदना प्रकट करतो, अशा शब्दात मोदींनी UNGAतील आपल्या भाषणाला सुरुवात केली.

मदर ऑफ डेमोक्रसी

‘मी अशा देशाचं प्रतिनिधित्व करत आहे, ज्याला मदर ऑफ डेमोक्रसीचा गौरव प्राप्त आहे. लोकशाहीची आमची हजारो वर्षांची परंपरा राहिली आहे. या 15 ऑगस्टला भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला. आमची विविधता ही आमच्या सशक्त लोकशाहीची ओळख आहे. एक असा देश ज्यात डझनावारी भाषा, शेकडो बोली भाषा आहेत. वेगवेगळे रहाणीमान, खानपान आहे. हे व्हायब्रंड लोकशाहीचं उदाहरण आहे’, असं मोदींची आवर्जुन सांगितलं.

‘ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे की एक छोटा मुलगा एका रेल्वे स्थानकावरील चहाच्या टपरीवर आपल्या वडिलांची मदत करत होता. तो आज चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून UNGA ला संबोधित करत आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले.

‘भारताने जगातील पहिली DNA व्हॅक्सिन विकसीत केली’

‘भारताचा व्हॅक्सिन डिलीव्हरी प्लॅटफॉर्म कोवीन एका दिवसात कोट्यवधी व्हॅक्सिन डोस देण्यात डिजीटल सहाय्यता देत आहे. मी UNGA ला ही माहिती देऊ इच्छितो की भारताने जगातील पहिली DNA व्हॅक्सिन विकसीत केली आहे. ही व्हॅक्सिन 12 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना दिली जाऊ शकते. भारताचे वैज्ञानिक एक नेजल व्हॅक्सिनच्या निर्माण कार्यात लागले आहेत. मानवते प्रति आपलं दायित्व लक्षात घेता भारताने पुन्हा एकदा जगाला व्हॅक्सिन देणं सुरु केलं आहे’, अस मोदी आपल्या भाषणात म्हणाले. त्याचबरोबर मोदींनी आपल्या भाषणातून जगातील लसनिर्मिती कंपन्यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं.

‘दूषित पाणी ही जगाची समस्या’

दूषित पाणी ही भारतच नाही तर जगातील सर्व, खासकरुन गरीब आणि विकसनशील देशांसाठी मोठी समस्या आहे. भारतात या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही 17 कोटीपेक्षा अधिक घरापर्यंत पाईप लाईनद्वारे पानी पोहोचवण्याचं मोठं कार्य केलं आहे.

दहशतवादावरुन मोदींचा पाकिस्तानला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता या दोन्ही देशांचे कान उपटले. जो देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत, त्यांनीही हाच दहशतवाद त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो याचं भान ठेवावं, असं सांगतानाच अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होता कामा नये. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे, असं आवाहन मोदींनी केलं. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना आपली गरज आहे. त्यामुळे त्यांना मदत करणं हे आपलं दायित्व आहे, असंही ते म्हणाले.

आमचे समुद्र ही आमची विरासत

आमचे समुद्र ही आमची विरासत आहेत. त्यामुळे आम्ही हे लक्षात घ्यावं की समुद्री शक्तीचा आपण योग्य वापर केला पाहिजे. आमचे समुद्र हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाईफलाईनही आहेत. आम्हाला विस्तार आणि बहिष्काराच्या शर्यतीत धावण्यापासून रोखण्याची गरज आहे, असंही मोदी यांनी नमूद केलंय.

43 कोटीपेक्षा जास्त लोक बँकिंग व्यवस्थेशी जोडले

‘मागील 7 वर्षात भारतात 43 कोटीपेक्षा जास्त लोक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. 36 कोटीपेक्षा अधिक अशा लोकांना विमा कवच मिळालं आहे, जे त्याबाबत आधी विचारही करत नव्हते. 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत उपचाराचा लाभ देत त्यांना क्वालिटी हेल्थशी जोडलं आहे’, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

इतर बातम्या :

PM Modi in US: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासंदर्भात चर्चा, मोदी-बायडन भेटीत आश्वासक सूर

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा, 5 महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi’s speech at the UN General Assembly

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.