Video : …आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी डेनमार्कच्या ढोलपथकात सामील झाले! मोदींचं ढोलवादन एकदा बघाच

Modi Denmark Drum Playing video : मोदींचं मोठ्या थाटामाटात जर्मनी पाठोपाठ डेनमार्कमध्येही स्वागत करण्यात आलं. जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्स असा मोदींचा तीन दिवसांचा युरोप दौरा होता.

Video : ...आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी डेनमार्कच्या ढोलपथकात सामील झाले! मोदींचं ढोलवादन एकदा बघाच
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Image Credit source: Twitter Video Grab
सिद्धेश सावंत

|

May 04, 2022 | 7:39 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे युरोप दौऱ्यावर (Modi Europe Tour) असताना त्यांनी तीन देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यादरम्यान डेनमार्कमध्ये असताना मोदींनी ढोल (Modi Denmark Drum Playing video) वाजवण्याचा आनंद लुटलाय. कोपेनहिगनमध्ये मोदींना ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी त्यांनी डेनमार्कमध्ये असलेल्या भारतीयांच्या मदतीनं ढोल वाजवून आनंद साजरा केला. भारतीयांसोबतच डेनमार्कमधील लोकंही यावेळी मोदींच्या स्वागतासाठी आली होती. तेव्हा ढोल-ताशा याच्या गजरात पारंपरिक भारतीय शैलीत मोदींचं स्वागत करण्यात आलं. युरोपात भारतीय परंपरेनुसार स्वागत होत असल्याचं पाहून पंतप्रधान नरेद्र मोदीदेखील भारावले. त्यांनी ढोल आपल्या कमरेला बांधून घेतला आणि ढोल ताशा पथकाचा हिस्सा होत ढोलवादन केलंय. मंगळवारी (3 एप्रिल) केलेल्या मोदींच्या ढोलवादनाचा व्हिडीओ एएनआय वृत्त संस्थेनं शेअर केला आहे.

मोदींचं मोठ्या थाटामाटात जर्मनी पाठोपाठ डेनमार्कमध्येही स्वागत करण्यात आलं. डेनमार्कमध्ये मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्स असा मोदींचा तीन दिवसांचा युरोप दौरा होता. या दौऱ्यावेळी वेगवेगळ्या करारांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या.

पाहा व्हिडीओ :

मोदी मोदीच्या घोषणा

डेनमार्कमधील नागरिकांना संबोधित करताना मोदींनी महत्त्वपूर्ण आवाहन केलंय. डेनमार्कमध्ये असलेल्या भारतीयांनी त्यांच्या डेनमार्कमधील मित्रांना भारत भेटीसाठी आमंत्रण द्यावं. भारत भेटीचं महत्त्व पटवून द्यावं, असं आवाहन यावेळी मोदींनी आपल्या संबोधनात केलंय. जर्मनी आणि डेनमार्कनंतर मोदी फ्रान्समध्ये जाणार असून हा त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस असणार आहे.

मोदींनी केलेलं संबोधन : पाहा व्हिडीओ

दरवर्षी तुम्ही 5 परदेशी मित्रांना भेट देण्याचं आमंत्रण पाठवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कमध्ये भारतीय नागरिकांना संबोधित करताना म्हटलं असून त्यांच्याकडून वचन घेतलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि डेन्मार्कमधील ऐतिहासिक द्विपक्षीय संबंध तसेच दोन्ही देशातील वाढत्या संबंधांबाबत चर्चा केली.

डेनमार्कच्या पंतप्रधानांनी मानले भारतीयांचे आभार


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें