PM Modi UK Visit : पंतप्रधान मोदींची किंग चार्ल्सशी भेट; काय दिले खास गिफ्ट, लंडनमध्ये त्याचीच चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी इंग्लंडच्या दौऱ्यात राजे चार्ल्स यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांना एक खास गिफ्ट दिले. त्यांच्या या गिफ्टची सध्या लंडनच तर गोऱ्या साहेबांच्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

PM Modi UK Visit : पंतप्रधान मोदींची किंग चार्ल्सशी भेट; काय दिले खास गिफ्ट, लंडनमध्ये त्याचीच चर्चा
किंग चार्ल्स तिसरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jul 25, 2025 | 9:40 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युनायटेड किंगडमच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यात राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली. राजांचे उन्हाळी निवासस्थान सँडरिंगहॅम हाऊस येथे ही भेट झाली. या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी राजाला एक खास भेट दिली. पंतप्रधानांनी किंग चार्ल्स तिसरे यांना डेव्हिडिया इनव्होलुक्रॅटा ‘सोनोमा’ या वनस्पतीची भेट दिली. आईच्या नावे एक झाड या उपक्रमातंर्गत ही भेट दिली. त्याची आता जगभर चर्चा होत आहे.

‘सोनोमा’ या वनस्पतीला सोनोमा डव्ह ट्री अथवा रुमाल वृक्ष असेही म्हणतात. ही भेट पंतप्रधान मोदींच्या पर्यावरणीय उपक्रम “एक वृक्ष आईच्या नावे” (एक पेड माँ के नाम) या उपक्रमाचा भाग आहे. आईच्या नावे, सन्मानार्थ एक झाड लावण्यास लोकांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे.

लंडनमध्ये अनोख्या उपक्रमाची चर्चा

ब्रिटनच्या राजघराण्याने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल X वरून या भेटीची पुष्टी केली. इंग्लंडच्या राजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सँडरिंगहॅम हाऊसमध्ये स्वागत केले, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजाला एक झाड भेट दिले. ‘सोनोमा’ या वनस्पतीला सोनोमा डव्ह ट्री अथवा रुमाल वृक्ष असेही म्हणतात. ही भेट पंतप्रधान मोदींच्या पर्यावरणीय उपक्रम “एक वृक्ष आईच्या नावे” (एक पेड माँ के नाम) या उपक्रमाचा भाग आहे.

सोनोमा कबुतराचे झाड असे ही त्याला म्हणतात. या वृक्षाला त्याच्या मोठ्या पांढऱ्या पानांसाठी ओळखले जाते. त्याची पाने मोठ्या रुमालांसारखी दिसतात. ही पानं रुमाल किंवा कबुतरांसारखी दिसतात. वृक्षरोपणानंतर २-३ वर्षांनीच या झाडाला फुले येतात. हे झाड बहरते.

कोणत्या मुद्दावर झाली चर्चा

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांन या भेटीविषयी एक्स हँडलवर माहिती दिली. त्यानुसार, पंतप्रधान मोदी आणि किंग चार्ल्स तिसरे यांनी द्विपक्षीय संबंध आणि भारत-इंग्लंड संबंधाच्या प्रगतीबाबत चर्चा केली. दोघांमध्ये आयुर्वेद, योग आणि मिशन लाईफ या मुद्दांवर चर्चा झाली. ब्रिटनमधील नागरिकांना योग, आयुर्वेदाचा फायदा व्हावा याबाबत राजे आग्रही दिसले.

राजघराण्याला भेट देण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी व्यापक द्विपक्षीय चर्चा केली. भारत-ब्रिट मुक्त व्यापार करारावर दोघांनी स्वाक्षरी केली. यावेळी पंतप्रधानांनी बकिंगहॅमशायर स्ट्रीट क्रिकेट हबच्या खेळाडूंशी संवाद साधला. क्रिकेट हा दोन्ही देशातील दुवा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. खेळ दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध सदृढ करण्यासाठी चालना देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची स्वाक्षरी असलेली बॅट यावेळी तरुणांना भेट दिली.