Thailand-Cambodia conflict : जगावर नव्या युद्धाचे सावट, थायलंड-कंबोडिया युद्धात चीनच्या खेळीने भारतावर काय होणार परिणाम?
Thailand Cambodia conflict : थायलंड आणि कंबोडियातील सीमा वादाने युद्ध भडकले आहे. चीन आणि अमेरिकेच्या खेळीने दोन्ही देशात संघर्ष वाढला आहे. दक्षिण पूर्व आशियात यामुळे अशांतता होईल.

जगात एक युद्ध बंद होत ना होते तोच दुसरे सुरू झाले आहे. सीमावादातून आणि एका मंदिरावरील हक्कातून कंबोडिया आणि थायलंड या दोन देशात युद्ध भडकले आहे. या युद्धामागे चीनचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीनला आशियात दबदबा तयार करायचा आहे. त्यामुळेच भारताचे शेजारी, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीवमध्ये त्याने अस्थिरता आणि भारताविरोधी वातावरण तयार होईल. आता या युद्धाच्या निमित्ताने आशियात चीनने कंबोडियाच्या मदतीने नवीन खेळी खेळली आहे. तर अमेरिकेचे पण हितसंबंध गुंतल्याचे म्हटले जात आहे.
24 जुलै रोजी सकाळी आशियात नवीन युद्ध सुरू झाले आहे. थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशाचे लष्कर समोरासमोर आले आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांवर बंदुकी ताणल्या आणि गोळीबार केला. कंबोडियाच्या सैनिकांनी MLRS म्हणजे मल्टिपल लॉन्च्ड रॉकेट सिस्टिमने हल्ला केला. थायलंडच्या अनेक शहरांवर हल्ले केले.
थायलंडमधील तीन प्रदेशातील शहरांमध्ये कंबोडियाने हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून थायलंडच्या वायुदलाने कंबोडियावर हल्ला चढवला. F-16 च्या लष्करी विमानांनी कंबोडियाच्या एका गॅस स्टेशनवर हल्ला चढवला. दोन्ही देशात सीमा वाद जुनाच आहे. यापूर्वी मे महिन्यातही दोन्ही देशात वाद पेटला होता. पण त्यावेळी दोघांनी सबुरीने घेतले होते.
चीनची कंबोडियाला फूस
कंबोडियाने कुरापत काढल्याचा दावा करण्यात येत आहे. चीन त्याला फूस लावत असल्याचे समोर आले आहे. युद्ध धोरण, लष्कर, शस्त्रास्त्र या सर्वच स्तरावर कंबोडिया हा देश अत्यंत कमकूवत आहे. त्याचा थायलंडविरोधात निभाव लागणार नाही. त्यामुळे चीनच्या मदतीशिवाय कंबोडिया मोठा डाव खेळू शकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या युद्धात चीनला त्याची शस्त्रास्त्र विक्री करण्याची संधी मिळेल. दक्षिण आशियात त्याचे प्राबल्य वाढेल. या पट्ट्यात भारताच्या हितसंबंधांना फटका बसण्याची शक्यता आहे. भारताच्या शेजारील देशांना फूस लावल्यानंतर आशियातील इतर भागातही भारत विरोधी भूमिका तयार करण्याची चीनची ही रणनीती असल्याचा दावा करण्यात येत आहे. युद्ध चिघळल्यास भारतीय व्यापारावर त्याचा परिणाम दिसेल.
