AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनोव्हेशनवर भारताचा जोर, जर्मन कंपन्यांना पंतप्रधान मोदींचं आवाहन काय?

News9 Global Summit च्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जर्मनीच्या संबंधावर भाष्य केलं. भारत आणि जर्मनीचं नातं अनेक शतकापासूनचं आहे. तमिळ आणि तेलगू पुस्तके छापणारा जर्मनी हा यूरोपातील पहिला देश आहे. भारतातील 50 हजार विद्यार्थी आज जर्मनीत शिक्षण घेत आहे, असं सांगतानाच आज जगातील सर्व देश भारतासोबत भागिदारी करण्यासाठी उत्सुक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनोव्हेशनवर भारताचा जोर, जर्मन कंपन्यांना पंतप्रधान मोदींचं आवाहन काय?
PM Narendra Modi Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 9:56 PM
Share

इंडो-जर्मन पार्टनरशीपचा एक नवा अध्याय निर्माण होत आहे. भारतातील एक मीडिया समूह जर्मनी आणि जर्मनीच्या नागरिकांना जोडण्याचं काम करत आहे, याचा मला अभिमान आहे. आपल्या सर्वात महत्त्वाच्या भागिदारांपैकी जर्मनी एक आहे. आज जगातील प्रत्येक देश भारतासोबत भागिदारी करण्यास उत्सुक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. टीव्ही9 ग्रुपच्या न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी भारत आणि जर्मनी या दोन्ही देशाच्या संबंधावर प्रकाश टाकला. तसेच जर्मन कंपन्यांना भारतात येण्याचं आवतनही त्यांनी दिलं.

जर्मनीने फोकस ऑन इंडिया डॉक्युमेंट जारी केलं आहे. आज जर्मनीत सुमारे तीन लाख भारतीय राहत आहेत. भारत-जर्मनीच्या संबंधाचा एक आणखी महत्त्वाचा पैलू भारतात पाहायला मिळतो. भारतात 1800 हून अधिक जर्मन कंपन्या सक्रिय आहेत. येणाऱ्या काळात भारत आणि जर्मनीच्या दरम्यान व्यापारी संबंध अधिक वाढतील याची मला खात्री आहे. भारत आज जगातील सर्वात वेगाने अर्थव्यवस्था वाढवणारा देश ठरला आहे. आणि जर्मनीचे फोक्स ऑन इंडिया डॉक्यूमेंट त्याचं प्रतिक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅक्स सिस्टिम बदलली

भारताने प्रत्येक क्षेत्रात नवीन पॉलिसी तयार केली आहे. भारताने 30 हजारहून अधिक नवीन कंप्लाइन्सेस संपवले आहेत. टॅक्स सिस्टिम व्यवस्थित केली आहे. भारतीय उद्योगांनी प्रगती करावी म्हणून ही पावलं उचलण्यात आली आहेत. जर्मनीच्या विकास यात्रेत मॅन्यूफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंगचा इतिहास मोठा आहे. त्यामुळेच मी जर्मन कंपन्यांना भारतात येण्याचं आमंत्रण देत आहे, असंही मोदी म्हणाले.

प्रत्येक क्षेत्रासाठी नवीन पॉलिसी

भारताचा संपूर्ण जोर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डीजिटल इनोव्हेशनवर आहे. भारताने प्रत्येक क्षेत्रासाठी एक नवीन पॉलिसी तयार केली आहे. 21 व्या शतकातील वेगवान विकासासाठी स्वत:ला तयार केलं आहे. भारताने बँकांना मजबूत केलं आहे. भारताने विकसित भारताची इमारत उभी करण्यासाठीचा पाया मजबूत केला आहे. या विकास यात्रेत जर्मनीही आपला पार्टनर असणार आहे, असंही मोदी यांनी सांगितलं.

मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठं परिवर्तन

मेक इन इंडियाशी जोडणाऱ्या मॅन्युफॅक्चररला भारताने आज प्रोडक्शन लीन इन्सेटिव्ह दिला आहे. आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठं परिवर्तन झालं आहे. आज मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत आघाडीवर आहे. भारत आज जगातील सर्वात मोठा टू व्हिलर मॅन्युफॅक्चरर आहे. जगातील दोन क्रमांकाचा स्टील अँड सिमेंट मॅन्युफॅक्चरर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.