PM नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलियाचे सर्वोत्तम भारतीय मित्र, पाहा कोणी केले हे वक्तव्य

| Updated on: Feb 24, 2024 | 3:58 PM

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत ते ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंतच सर्वात उत्तम मित्र असल्याचे म्हटले आहे. टोनी ॲबॉट यांनी पंतप्रधान मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. भारत एक मजबूत लोकशाही असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

PM नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलियाचे सर्वोत्तम भारतीय मित्र, पाहा कोणी केले हे वक्तव्य
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक देशांच्या प्रमुखांसोबत चांगलं संबंध प्रस्तापित केले आहेत. भारताचे वर्चस्व वाढवण्यात त्यांना मोठे यश आले आहे. त्यामुळेच अनेक देशांमध्ये आज भारतासोबत मैत्री करण्यासाठी चढाओढ दिसते आहे. त्यात आता  ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तम मित्र असे वर्णन केले आहे. टोनी ॲबॉट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत हा एक मजबूत लोकशाही असलेला देश आहे. पंतप्रधान मोदींसोबत काम करायला ऑस्ट्रेलियाला खूप आनंद होईल. असं ही ते म्हणाले आहेत.

पीएम मोदी ऑस्ट्रेलियाचे सर्वोत्तम मित्र

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट हे एका मुलाखतीत म्हणाले की, पीएम मोदी ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम भारतीय मित्र आहेत. आगामी निवडणुकीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. साहजिकच, भारत एक मजबूत लोकशाही आहे आणि या देशातील सरकार वेळोवेळी बदलत असते. मी भारतीय लोकांना सल्ला देऊ इच्छित नाही, परंतु, मला ऑस्ट्रेलियन दृष्टीकोनातून माहित आहे की पुढील अनेक वर्षे पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यात आम्हाला आनंद होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध अतिशय मजबूत असल्याचेही ॲबॉट म्हणाले. हे नाते काळानुरूप घट्ट होत आहे. ही जगातील उदयोन्मुख लोकशाही महासत्ता आहे.

भारत प्रबळ दावेदार

शॉम्बी शार्प यांनी रायसीना संवाद महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील निवासी समन्वयक शॉम्बी शार्प म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने या कार्यक्रमात सहभागी होणे ही आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे.

रायसीना डायलॉगची नववी आवृत्ती सर्व बदलांमध्ये भारताचे यश आणि प्रभावी नेतृत्व प्रतिबिंबित करते. भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य होण्याचा प्रबळ दावेदार असल्याचेही ते म्हणाले.

दुसरीकडे सौदी अरेबियाने देखील यासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यासाठी भारताला आतापर्यंत अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. सध्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन हे पाच देश स्थायी सदस्य आहेत. चीनचा मात्र याला विरोध आहे.