Explained : भारताला ‘डेड इकोनॉमी’ म्हणणाऱ्या ट्रम्पना पीएम मोदी यांचं जोरदार प्रत्युत्तर, एका दगडात मारले अनेक पक्षी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सेमीकॉन इंडिया 2025 संम्मेलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा केली. सेमीकंडक्टर उत्पादनात भारताने एक लक्ष्य निर्धारित केलं आहे. भविष्यात जगासाठी सेमीकंडक्टर महत्वाची वस्तु ठरणार आहे. त्यात भारताची प्रगती कशी असेल, याची माहिती दिली. सेमीकॉन इंडिया 2025 च्या मंचावरुन त्यांनी अमेरिका आणि चीनसह जगाला एक संदेश दिला.

भारताने आपल्या पहिल्या विक्रम चीपचं अनावरण केलं आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी या मंचावरुन देशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. खासकरुन ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि डेड इकोनॉमीच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. सेमीकंडक्टर उत्पादनात भारताचं स्थान बळकट करणं आणि चीनची मोनोपॉली तोडण्याचे संकेत दिले आहेत. सेमीकॉन इंडिया 2025 च्या मंचावरुन त्यांनी एकादगडात अनेक पक्षी मारले. आर्थिक आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची मतं मांडली. टॅरिफमुळे ज्या प्रकारे जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांवर संकट पहायला मिळतय. इकोनॉमिक ग्रोथ एकप्रकारे थांबलीय. भारताने त्या देशांच्या तुलनेत आर्थिक आघाडीवर चांगलं प्रदर्शन केलय असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
जगाचा भारतावर विश्वास आहे. जग भारतासोबत सेमीकंडक्टरच भविष्य बनवण्यासाठी तयार आहे. जगात तेलाला काळं सोन म्हटलं जातं. सेमीकंडक्टर म्हणजे चीप्सला डिजिटल विश्वात हिरा म्हटलं जातं. याचे अनेक अर्थ आहेत. अलीकडेच त्यांनी जपान दौरा केला. त्यावेळी त्यांचा फोकस सेमीकंडक्टरवर होता. या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी ट्रम्प आणि चीनला काय संकेत दिले? ते जाणून घ्या.
भारताने सर्वांचे अंदाज चुकवले
डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला डेड इकोनॉमी म्हणाले होते. त्याला पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर दिलं. भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या तिमाहीत 7.8 टक्क्याने वाढली. वैश्विक अनिश्चितता आणि आर्थिक स्वार्थामुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सर्व अंदाज चुकवले असं पीएम मोदी म्हणाले. सेमीकॉन इंडिया 2025 सम्मेलनात ते बोलले की, एप्रिल ते जूनमध्ये जीडीपी ग्रोथ प्रत्येक अपेक्षा, आशा आणि अनुमानापेक्षा जास्त होता. जागतिक अनिश्चितता आणि आर्थिक स्वार्थामुळे निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर भारताने हे प्रदर्शन केल्याची पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताने प्रत्येक अपेक्षा, अंदाजापेक्षा चांगलं काम केलय. जगभरातील अर्थव्यवस्था आर्थिक स्वार्थामुळे प्रेरित चिंता आणि आव्हानांचा सामना करत आहेत, अशावेळी भारताने 7.8 टक्के विकास दर गाठला आहे.
प्रत्येक नागरिकामध्ये नवीन ऊर्जेचा संचार
‘हा विकास सर्व क्षेत्र उत्पादन, सर्विस, शेती आणि निर्माण यामध्ये दिसतोय’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी जोर देऊन म्हणाले. “भारताच्या या विकासामुळे सर्व उद्योग आणि प्रत्येक नागरिकामध्ये नवीन ऊर्जेचा संचार होत आहे. विकासाचा हाच वेग भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पुढे नेत आहे” असं पीएम मोदी म्हणाले. पंतप्रधान आव्हानांबद्दल स्पष्टपणे काही बोलले नाहीत. आपण रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला आहे. एकूण भारतावरील टॅरिफ 50 टक्के झाला आहे. जगात भारताच्या सामानावरच सर्वाधिक 50 टक्के टॅरिफ आहे. ट्रम्प यांनी शुल्क लावण्याच्या आधी भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड म्हटलं होतं.
गरज नसताना, भारताबद्दल कठोर शब्द वापरले
भारत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्था विकास वेगाच्या बाबतीत चीन भारतापेक्षा मागे आहे. एप्रिल-जून महिन्यात अमेरिकी अर्थव्यवस्था 3.3 टक्के वेगाने वाढली. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून अमेरिकेने भारतावर टीका केली. गरज नसताना, भारताबद्दल कठोर शब्द वापरले. अजूनही अमेरिकेच हेच सुरु आहे.
नवीन सुधारणा कार्यक्रम काय?
मोदी यांनी आधीच संकेत दिलेत की, त्यांचं सरकार नवीन सुधारणा कार्यक्रम लागू करणार आहे. पंतप्रधान मोदींनी नवीन सुधारणांबद्दल विस्ताराने सांगितलं नाही. पण जीएसटीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत आहेत. यात शॅम्पू, हायब्रिड कारपासून वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या करात कपात केली जाईल. जीएसटी परिषदेची तीन सप्टेंबरला नवी दिल्लीत दोन दिवसीय बैठक होणार आहे. यात प्रस्तावित दर कमी करण्याबद्दल चर्चा होऊ शकते.
टॅरिफमुळे स्वदेशीला चालना मिळेल
ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये अमेरिकेचा कारभार संभाळला. तेव्हाच त्यांनी टॅरिफचा मुद्दा लावून धरण्याचे संकेत दिले होते. भारताशिवाय ब्राझीलच्या सामानावर अमेरिकेत 50 टक्के टॅरिफ आहे. ट्रम्प यांचा तर्क आहे की, अशा प्रकारच्या टॅरिफमुळे स्वदेशीला चालना मिळेल आणि नोकऱ्यांच संरक्षण होईल. त्यांच्या या व्यापारी धोरणाने जगभारत आर्थिक अराजकता निर्माण केली आहे. अमेरिकेने आतापर्यंत कधीच असं बचावात्मक व्यापारी धोरण अवलंबल नव्हतं. पण डोनाल्ड ट्रम्प याला अपवाद आहेत.
छोटी चीप मोठ्या बदलाचा पाया रचेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकॉन इंडिया 2025 च उद्घाटन केलं. जग भारतासोबत सेमीकंडक्टरच भविष्य बनवण्यास तयार आहे असं मोदी यांनी सांगितलं. जगातील सर्वात छोटी चीप लवकरच जगात मोठ्या बदलाचा पाया रचेल असं पीएम मोदी म्हणाले. समिटला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ‘जगाचा भारतावर विश्वास आहे’
‘प्रवास उशिरा सुरु झाला, पण कोणी थांबवू शकत नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आमचा सेमीकंडक्टरचा प्रयत्न केवळ चीप निर्मितीपुरता मर्यादीत नाही. आम्ही एक अशी इकोसिस्टिम बनवत आहोत, जी भारताला जागतिक स्तरावर स्पर्धक आणि आत्मनिर्भर बनवेल” “भारत आता बॅकएंडमधून पुढे जाऊन फुल-स्टेक सेमीकंडक्टर राष्ट्र बनण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा भारतात बनलेली छोटी चीप जगात मोठ्या बदलाचा पाया रचेल. आमचा प्रवास उशिरा सुरु झाला. पण कोणी थांबवू शकत नाही” असं विश्वास पीएम मोदी यांनी व्यक्त केला.
चीपची बाजारपेठ किती ट्रिलियन डॉलरची असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मागच्या शतकात तेलाने आकार दिलेला. जगाच भाग्य तेल विहिरींशी संबंधित होतं. पण 21 व्या शतकात जग छोट्या चीपशी केंद्रीत आहे. चीप छोटी असली तरी, जगाची प्रगती वेगाने करण्याची ताकद आहे. त्यामुळे जे ग्लोबल सेमीकंडक्टर मार्केट सध्या 600 अब्ज डॉलरच आहे, ते येणाऱ्ंया वर्षांमध्ये 1 ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. ज्या पद्धतीने भारत पुढे जातोय, निश्चितच 1 ट्रिलियन डॉलरच्या बाजारात भारताचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा असेल. सेमीकंडक्टर सेक्टरमधील आघाडीची जपानी कंपनी टोक्यो इलेक्ट्रॉन मियागी लिमिटेडचा दौरा केल्यानंतर हे शिखर सम्मेलन होत आहे. टीईएल मियागीच्या दौऱ्यानंतर मोदी म्हणाले की, सेमीकंडक्टर सेक्टर भारत-जापान सहकार्याच एक प्रमुख क्षेत्र आहे.
भारताच 2024-2025 पर्यंत सेमीकंडक्टर मार्केट किती वाढेल?
रविवारी एका अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलय की, उद्योगाच्या अंदाजानुसार, भारतीय सेमीकंडक्टरचा बाजार 2030 पर्यंत दुप्पटपेक्षा वाढून 100-110 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. भारतीय सेमीकंडक्टर मार्केट 2024-2025 पर्यंत जवळपास 45-50 अब्ज डॉलरच होईल. 2023 मध्ये हे मार्केट 38 अब्ज डॉलरच होतं.
उद्योगाच्या अंदाजानुसार, भारतीय सेमीकंडक्टर मार्केटचा आकार 2023 मध्ये जवळपास 38 अब्ज डॉलर, 2024-2025 मध्ये 45-50 अब्ज डॉलर आणि 2030 पर्यंत 100-110 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तैवान जगातील एक छोटासा देश जगातील 60 टक्के सेमीकंडक्टरच उत्पादन करतो. यात जवळपास 90 टक्के
#WATCH | At Semicon India 2025, Prime Minister Narendra Modi says, “Just a few days ago, the GDP numbers for the first quarter of this year have come. Once again, India has performed better than every expectation, every assessment. At a time when there are concerns in the economy… pic.twitter.com/MbDg4UkCOd
— ANI (@ANI) September 2, 2025
अत्याधुनिक सेमीकंडक्टर आहेत. संयुक्त राज्य अमेरिका, ईयू, जापान आणि दक्षिण कोरियाने घरेलू चीप निर्माणाला समर्थन देत कुठल्याही सेक्टरवर अत्यधिक निर्भरता कमी करण्यासाठी राष्ट्रीय रणनीती सुरु केली आहे. ग्लोबल सेमीकंडक्टर मार्केट 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यात भारताचा एक महत्वाचा हिस्सा असेल.
