
अमेरिकेच्या आडेमुठेपणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील समीकरणं वेगाने बदलताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे इतर देशांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आता इतर देशांनी अमेरिकेविरुद्ध मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात तसं काही मैत्रीचं नातं नाही. पण अमेरिकेच्या धोरणांमुळे या दोन्ही देशांमधील जवळीक वाढली आहे. याचा भाग म्हणून पंतप्रधान मोदी आता चीन दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. जापानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या आमंत्रणानंतर पीएम मोदी 15व्या भारत-जापान वार्षिक शिखर सम्मेलनात भाग घेणार आहेत. 29 ते 30 ऑगस्ट दरम्यान जापान दौऱ्यावर असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी जापानला आठव्यांदा जाणार आहेत. पण पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत पहिली बैठक आहे. त्यानंतर दोन दिवस चीन दौऱ्यावर असतील. हा महत्त्वाचा दौरा असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सात वर्षानंतर चीन दौऱ्यावर जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी 2018 मध्ये किंगदाओमध्ये होणाऱ्या शांघाई सहयोग संघटन शिखर सम्मेलनात गेले होते. त्यानंतर गलवान खोऱ्यात संघर्ष हा. 15 जून 2020 मध्ये हा वाद टोकाला गेला होता. भारत चीन 1962 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देश आमनेसामने आले होते. गेल्या काही वर्षात हे संबंध ताणले गेले होते. मात्र अमेरिकेच्या भूमिकेमुळे पुन्हा या दोन देशात मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे.
शांघाई सहयोग संघटन तियानजिन शिखर सम्मेलन 2025 ही 25वी राष्ट्राध्यक्ष परिषद आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी दोन दिवस असणार आहे. ही बैठक तियानजिन येथे होणार आहे. चीन पाचव्यांदा शांघाई सहयोग संघटन शिखर सम्मेलनाचं आयोजन करत आहे. या बैठकीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडणार आहे. अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल? टॅरिफ मागे घेणार की वाढवणार असे एक ना अनेक प्रश्न असतील. ट्रम्प भारतासोबत कसा व्यवहार करतीय याकडे लक्ष लागून आहे.