AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Ji Thali : येथे मिळणार ‘मोदीजी थाली’, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येथे होणार पाहुणचार, थाळीत असणार ही पक्वांनं

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 जूनला अमेरीकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा तसा खास असणार आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दाम्पत्याने नरेंद्र मोदी यांना या खास मेजवाणीचे निमंत्रण दिले आहे.

Modi Ji Thali : येथे मिळणार 'मोदीजी थाली', भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येथे होणार पाहुणचार, थाळीत असणार ही पक्वांनं
PM Narendra Modi Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 12, 2023 | 9:03 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अमेरिकेत प्रचंड वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील न्यू जर्सी ( Pm Narendra Modi Visit In New Jersey ) येथे राजकीय मेजवाणीसाठी जाणार आहेत. 22 जूनच्या रात्री ही मेजवाणी होणार आहे. ज्याचे यजमान पद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वत: आहेत. तसेच मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा अमेरिकन दौरा खास असणार आहे. कारण या दौऱ्या दरम्यान न्यू जर्सी येथील एका रेस्तरॉंमध्ये मोदींसाठी स्पेशल ‘मोदीजी थाली’ सादर केली जाणार आहे. काय असणार आहे या थाळीत पाहूयात..

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 जूनला अमेरीकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा तसा खास असणार आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दाम्पत्याने यांनी नरेंद्र मोदी यांना मेजवाणीचे खास निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या नावाने न्यूर्सीच्या एका रेस्टॉरंटमध्ये खास अनिवासीय भारतीयांसाठी ( एनआरआय )  एका स्पेशल थालीचे लाॅंचिंग केले जाणार आहे. मिडीया रिपोर्टनूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारंपारिक भारतीय जेवण खूप आवडते. त्यात खास करून गुजराथी पदार्थांवर त्यांचे खास प्रेम आहे. यापूर्वी स्पेशल बिहारी डीश बाटी चोखा चाखली होती. तसेच ते मोसमातील फळे, मशरुम, सरसो का साग, आणि हिरव्या पालेभाज्या अत्यंत आवडीने खातात.

पंतप्रधान यांच्या आवडत्या डीशेस

न्यू जर्सी येथील रेस्टॉरंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मोदीजी थाली लॉंच करण्याची जय्यद तयारी सुरू आहे. मोदीजी थाली मध्ये भारतीय पंक्वानांचा समावेश असून त्यात मोदी यांची आवडती डीश खिचडी देखील सादर केली जाणार आहे. याशिवाय सरसों का साग, रसगुल्ला, दम आलू पासून ते कश्मीरी डीशेस, इडली, ढोकळा, छास आणि पापड यांचा समावेश आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.