AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी रहस्यमयी जागा, जेथून जमीन नाही, अंतराळ आहे जवळ ! हजारो किमीपर्यंत मनुष्यच काय कोणताही जीव नाही…

येथे सर्वात जवळचा मानव हा अंतराळ स्थानकातील अंतराळवीर असतो. हे ठिकाण जगातील सर्वात दुर्गम आणि कोणताही सजीव नसलेले आहे. अनेक सॅटेलाईट आणि अंतराळ स्थानकांची ही दफन भूमी बनली आहे.

अशी रहस्यमयी जागा, जेथून जमीन नाही, अंतराळ आहे जवळ ! हजारो किमीपर्यंत मनुष्यच काय कोणताही जीव नाही...
point nemo
| Updated on: Sep 26, 2025 | 3:15 PM
Share

आपल्या पृथ्वीवर एक अशी जागा आहे. जेथे सर्वात जवळील मनुष्य हा अंतराळस्थानकातील अंतराळवीर आहे. समुद्राच्या या पॉईंटपासून प्रत्येक दिशेला हजारो किलोमीटर कोणतीही जमीन आणि मनुष्यप्राण्याचं अस्तित्व नाही. पॉईंट निमो पृथ्वीवरील अशा दुर्गम जागा आहे. जेथे कोणताही समुद्री जीव जन्माला येऊ शकत नाही. अंतराळातील आयुर्मान संपलेले उपग्रह किंवा अंतराळस्थानकांचे या जागी डम्पिंग केले जाते. कोणतीही आहे हे पृथ्वीवरील रहस्यमय जागा ते पाहूयात…

पॅसिफीक महासागराच्या दक्षिणेमध्ये स्थित पॉईंट निमो सर्वात जवळील जमीन 1,670 मैल (2,668) किलोमीटर दूरवर आहे. या पृथ्वीवरील सर्वात दुर्गम जागा मानले जाते. हा पॉईंट इक्वेटर, इंटरनॅशलन डेट लाईन आणि 90th मेरिडियन वेस्टच्या इंटरसेक्शन ( जेथे या तिन्ही रेषा मिळतात ) वर स्थित आहे. या क्षेत्रावर कोणत्याही देशाचा अधिकार नाही.

येथील सर्वात जवळील जमीन उत्तर दिशेला पिटकेर्न आयलँड समुहातचा ड्यूसी आयलँड, उत्तर पूर्व दिशेला ईस्टर आयलँड श्रृंखलेचा मोतू नी आणि दक्षिणेला अंटार्टिकाचा एक दावा नसलेले क्षेत्र मॅरी बर्ड लँडच्या तटावरील माहेर आयलँड आहे. मात्र, या तिन्ही जागी कोणतीही मनुष्यवस्ती नाही.

मानवाला भेटण्यासाठी तुम्हाला तीन हजार किमीवर जगातील एक आयसोलेटेड जागेपैकी एक असलेल्या ईस्टर आयलँड वा 4 हजार किलोमीटर दूरवरील न्यूझीलँडला जावे लागेल, जेथे केवळ नावेद्वारे पोहचता येते. या प्रवासाला दोन आठवड्यांपेक्षा अधिक वेळ लागतो.

का आहे हा पॉईंट ऑफ इनएक्सेसिबिलिटी?

पॉईंट निमोला महासागरांचा पॉईंट ऑफ इनएक्सेसिबिलिटी म्हटला जातो. पॉईंट ऑफ इनएक्सेसिबिलिटी म्हणजे ती जागा जेथे कोणत्याही कोस्टलाईन किंवा तटरेषेपासून सर्वात दूर असते. नकाशावर हा त्या भूभागाचा सेंटर पॉईंट असतो. प्रत्येक दिशेला ही जागा जवळच्या जमीनीपासून 2,688 किलोमीटर समान अंतरावर आहे. पृथ्वीवरील अन्य पॉईंट ऑफ इनएक्सेसिबिलिटी उत्तरमध्ये आर्कीक्ट महासागरातील बर्फ आणि दक्षिणमध्ये अंटार्टिकामधील सोव्हिएकृत संघाचे जुने संशोधन स्टेशन आहे.

सॉफ्टवेअरने काढले लोकेशन

पॉईंट निमोला सर्वात आधी साल 1992 मध्ये हर्वोजे लुकाटेला (Hrvoje Lukatela) नावाच्या कॅनेडीयन सर्व्हे इंजिनिअरने शोधून काढले होते. त्यांनी युएस डिफेन्स मॅपिंग एजन्सी ( आता जिओस्पेशियल इंटेलिजन्स एजन्सी ) च्या ‘डिजिटल चार्ट ऑफ द वर्ल्ड’ने सॅटेलाईट्सच्या ऑर्बिट आणि जमीनी लोकेशनचा डेटा घेऊन एका सॉफ्टवेअरमध्ये टाकला आणि पॉईंटची लोकेशन मोजले.

माशाचे नाव नाव नाही !

लोकांना पॉईंट निमो हे नाव नेहमी प्रसिद्ध डिझनी फिल्म फायडिंग निमोमधील मुख्य पात्र असेलेल्या निमो या माशाच्या नावावर ठेवलेय असे वाटत असते. परंतू वास्तवात निमोचा लॅटीन अर्थ ‘नो मॅन’असा होतो. पॉईंट निमोचे नाव लेखक जूल्स वर्ने यांचे पुस्तक ‘20,000 लीग्स अंडर द सी’ चे पात्र कॅप्टन निमो यांच्या नावावरुन ठेवले आहे.

कोणताही जीव रहात नाही

पॉईंट निमोच्या समुद्र तळात प्रचंड प्रेशर असल्याने तसेच कमी तापमान आणि सु्र्याचा प्रकाश पोहचत नसल्याने कोणताही समुद्री जीव येथे जगू शकत नाही. तरीही पॉईंट निमोच्या समुद्रातळातील ज्वालामुखीच्या वेंट ( ओपनिंग ) मध्ये काही बॅक्टेरिया आणि लहान खेकडे सापडले होते.

अंतराळ स्थानक जमीनीपेक्षा जवळ

पॉईंट निमोच्या सर्वात जवळची जमीन हजारो किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथून सर्वात जवळचे मानवी ठिकाण अंतराळ स्थानक आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या पॉईंटपासून केवळ 415 किलोमीटर दूर अंतरावर आहे. आयएसएसचा ऑर्बिट पृथ्वीपासून जवळ असल्याने पॉईंट निमोच्या वरुन जात असतो.

नादुरुस्त स्पेस सॅटेलाइट्सचे डम्पिंग ग्राऊंड

नादुरुस्त झालेले किंवा आयुर्मान संपलेले अंतराळातील उपग्रह पॉईंट निमोत फेकले जातात. अंतराळ संशोधन संस्था या सर्व निरुपोगी स्पेस स्थानकांनाही नियंत्रित लँडींगच्या मदतीने येथे पाटवते. येथे सर्वात साल 1971 मध्ये सोव्हिएत संघाचा सॅल्युट 1 स्पेसक्राफ्ट फेकण्यात आला होता. तेव्हापासून मीर स्पेस स्टेशन, स्कायलॅब स्पेस स्टेशन, स्पेस-एक्सचे एक रॉकेट आणि बीगल 2 मार्स लँडर सारखे 250 हून अधिक सॅटेलाईट पॉईंट निमोत दफन झाले आहेत. साल 2028 ते 2030 दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला देखील अंतराळातून येथे डंम्प केले जाणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.