AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोर्टा-पॉटी पार्टी.. झगमगत्या दुबईचं ‘डार्क सिक्रेट’; महिलांसोबत किळसवाणा प्रकार, अंगावर येईल काटा!

दुबई म्हटलं की अत्यंत झगमगतं, आलिशान लाइफस्टाइल हेच चित्र समोर येतं. परंतु याच दुबईची एक काळी बाजूसुद्धा आहे, जी आता हळूहळू समोर येत आहे. अनेक महिला सोशल मीडियाद्वारे दुबईतील पोर्टा-पॉटी पार्टीजचा खुलासा करत आहेत.

पोर्टा-पॉटी पार्टी.. झगमगत्या दुबईचं 'डार्क सिक्रेट'; महिलांसोबत किळसवाणा प्रकार, अंगावर येईल काटा!
partiesImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 04, 2025 | 3:28 PM
Share

दुबई हे जगातील सर्वांत श्रीमंत शहरांपैकी एक.. टोलेजंग इमारती, आलिशान गाड्या, पंचतारांकित हॉटेल्स आणि जगभरातील शेकडो प्रभावशाली व्यक्तींचं घर यासाठी ओळखलं जाणारं हे शहर. दुबई बाहेरुन अत्यंत चकचकीत आणि झगमगती दिसत असली तरी त्या शहराचं एक डार्क सिक्रेट समोर आलं आहे. तिथल्या मुलींसोबत होणाऱ्या अमानवी कृत्यांचं प्रमाण जाणून तुम्हाला धक्का बसेल. अत्यंत चमकदार दिसणाऱ्या या शहरात प्रत्यक्षात भयानक अंधारात लपलेलं एक सत्य आहे. दुबईमध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने काही पार्ट्या आयोजित केल्या जातात आणि अशा पार्ट्यांना ‘पोर्टा-पॉटी’ म्हणतात. या पार्ट्यांमध्ये मुलींना ग्लॅमरस जीवनाची स्वप्नं दाखवली जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं. अत्यंत अमानवी पद्धतीने त्यांना वासनेचे बळी बनवले जातात.

पोर्टा-पॉटी पार्टीज म्हणजे नेमकं काय?

पोर्टा-पॉटी पार्टीज हे खासगी कार्यक्रम असतात, जिथे तरुण मुली, मॉडेल्स, अभिनेत्री हे अत्यंत प्रभावशाली लोकांना बळी पडतात. त्यांना आलिशान भेटवस्तू दिल्या जातात, पंचतारांकित हॉटेल्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते, त्यांना महागड्या डिझायनर बॅग्ज आणि दागिन्यांचं आमिष दाखवलं जातं. त्या बदल्यात त्यांना अपमानास्पद, अमानवी लैंगिक कृत्यांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडलं जातं. तिथे या मुलींसोबत अमानुष कृत्ये केली जातात आणि त्यांचं क्रूर लैंगिक शोषण केलं जातं.

अत्यंत किळणवाणा आणि अंगावर काटा आणणारा प्रकार

या पार्ट्यांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात. महिलांच्या अंगावर घाणेरडा कचरा फेकला जातो. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर मानवी विष्ठाही फेकली जाते. त्यांना चाबकाचे फटके मारले जातात, त्यांच्यावर थुंकलं जातं. काहींचा गळा दाबून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. या पार्ट्यांमध्ये मुलींना बांधून ठेवून तिच्या शरीरावर मशीनगनने जखमा करण्यात येतात. या पार्ट्या अत्यंत श्रीमंत, अरब व्यापारी आणि शेख यांच्याकडून आयोजित केल्या जातात.

रेडिटवरून खुलासे

सोशल मीडियावरील रेडिट प्लॅटफॉर्मवर अशा अनेक घटना उघड झाल्या आहेत. काही महिलांनी त्यांची ओळख लपवून दुबईचं हे डार्क सिक्रेट समोर आणलं आहे. एका स्पॅनिश मुलीने सांगितलं की, तिला चाबकाचे फटके देण्यात आले, तिच्यावर थुंकलं गेलं, तिच्यावर मशीनगनने अत्याचार झाले. या सगळ्या प्रकारात त्या मुलीचा हातदेखील मोडला होता. हे फक्त एकच उदाहरण नाही, तर अशा अनेक घटना आहेत, ज्या आता हळूहळू उघड होत आहेत. या पार्ट्यांनंतर पीडित महिला कधी गायब होतात किंवा कधी अज्ञात परिस्थितीत मृतावस्थेत आढळतात.

या भयानक सत्याचं सर्वांत क्रूर उदाहरण म्हणजे युक्रेनमधील 20 वर्षीय मॉडेल मारिया कोवलचुक. दोन मॉडेलिंग एजंट्ससोबत दुबईला गेलेली मारिया दुसऱ्या दिवशी सापडलीच नाही. दहा दिवसांनंतर रस्त्याच्या एका कडेला तिचा मृतदेह आढळला होता. तिच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या, तिच्या गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या, तिचा पाठीचा कणा तुटला होता. ती एका निर्माणाधीन इमारतीवरून पडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. परंतु ती पोर्टा-पॉटी पार्टीची बळी होती, असा दावा तिच्या आईने केला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.