पुढच्या 48 तासांमध्ये जोरदार धमाका होणार? चवताळलेल्या इराणचा मोठा निर्णय, अमेरिका हाय अलर्टवर
इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या अणू केंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेमधील तणाव आणखी वाढला आहे.

इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या अणू केंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेमधील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराण चांगलाच चवताळला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इराण पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. मीडल इस्ट मध्ये असलेले अमेरिकेची तळं इराणच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहिती प्रमाणे इराणची हल्ल्याची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्या इशाऱ्याची प्रतिक्षा आहे. अयातुल्लाह खामेनेई यांचा आदेश येताच अमेरिकेच्या मध्यपूर्वेमधील तळांवर मोठा हल्ला होऊ शकतो, यासंदर्भात इराणचे आर्मी चीफ अब्दुल रहीम मौसावी यांनी माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना या हल्ल्याबाबत माहिती मिळाली आहे, त्यामुळे आता मिडल इस्टमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैन्याला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही क्षणी अमेरिकेच्या तळांवर हल्ला होऊ शकतो. हा हल्ला अयशस्वी करण्याचा प्रयत्न आता अमेरिकेकडून सुरू आहे. अमेरिकेनं शनिवारी मध्यरात्री इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला केला. त्यानंतर आता इराणकडून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. या हल्ल्याचा बदला आम्ही घेऊ असा इशारा त्याचवेळी खामेनेई यांनी दिला होता. त्यामुळे हे युद्ध आता जास्तच भडकण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला
शनिवारी अमेरिकेकडून इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये इराणचं प्रमुख अणू केंद्र असलेल्या फोर्डोचा देखील समावेश आहे. यामध्ये इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आज सकाळी पुन्हा एकदा याच अणू केंद्रांवर इस्रायलकडून देखील हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून देखील इस्त्रायलवर हल्ले सुरूच आहेत.
इराणला रशियाचा पाठिंबा
मोठी बातमी म्हणजे रशियानं आता इराणला उघडपणे पाठिंबा दिला आहे. इराणला पाहिजे ती मदत आम्ही करू, आता ते त्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. जर आमचे सैन्य इराणच्या बाजुने या युद्धात उतरले तर त्याचे परिणाम गंभीर असतील असा इशारा रशियाकडून देण्यात आला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुतीन यांच्यासोबत चर्चा केली.
